अकोला जिल्हा परिषदेत अनुपस्थित सहा कर्मचाऱ्यांना नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 02:00 PM2018-07-01T14:00:37+5:302018-07-01T14:04:04+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी शनिवारी सकाळीच विविध विभागात भेट देत उपस्थितीचा आढावा घेतला. अनुपस्थित असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली.
अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत दांडी मारून बाहेरचा रस्ता धरतात. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी शनिवारी सकाळीच विविध विभागात भेट देत उपस्थितीचा आढावा घेतला. अनुपस्थित असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकांच्या विविध समस्यांवर तोडगा निघावा, यासाठी जिल्हा परिषदेत अनेक जण धाव घेतात; मात्र संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी जागेवरती सापडत नाहीत. त्यांना पदाधिकाºयांकडे धाव घेत अधिकाºयांशी संपर्क करावा लागतो. हा प्रकार जिल्हा परिषदेत नेहमीचाच आहे. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी बुधवारी सकाळी विविध कार्यालयांत भेट दिली. यावेळी ६ कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. त्या सर्वांना विनावेतन रजा का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी पगारे यांनी कार्यालयांची झाडाझडती घेतली. यावेळी आरोग्य विभागातील चार, लघुसिंचन विभाग-१, अर्थ विभागातील १ कर्मचारी अनुपस्थित आढळला.