जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना बजावल्या नाेटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 11:14 AM2021-05-23T11:14:33+5:302021-05-23T11:18:34+5:30

Akola News : बाजारातील ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार पुन्हा नाेटिसा बजावण्यात आल्या.

Notices to the traders in the public vegetable market in Akola | जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना बजावल्या नाेटिसा

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना बजावल्या नाेटिसा

Next
ठळक मुद्देकाेराेनाच्या संकटात साेमवारी सुनावणीअकाेला मनपा वादाच्या घेऱ्यात

अकाेला : शहरात संसर्गन्य काेराेना विषाणूचा सामना करताना प्रशासकीय यंत्रणांची तारांबळ उडाल्याची परिस्थिती असताना महापालिकेला जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांची दुकाने पाडण्याची घाई झाल्याचे दिसत आहे़ बाजारातील ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार पुन्हा नाेटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना सुनावणीसाठी २४ व २५ मे राेजी मनपात उपस्थित राहण्याचे सूचित करण्यात आले आहे़ शहरातील अनेक याेजना प्रलंबित असताना जनता भाजी बाजाराच्या मुद्यावर प्रशासनाकडून हाेणाऱ्या हालचाली वादाच्या भाेवऱ्यात सापडल्या आहेत़

महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजारात प्रवेश करणाऱ्या मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याची सबब पुढे करीत त्यांना हुसकावण्याच्या कारवाइला प्रारंभ केला हाेता़ त्यानंतर शहरात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जनता भाजी बाजारात भाजीपाला व फळ विक्री तसेच हर्रासी करण्यावर निर्बंध लादण्यात आले़ यादरम्यान, अचानक बाजारातील सुमारे ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले़ याप्रकरणी व्यावसायिकांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत़ शहरावर काेराेनाचे संकट घाेंगावत असताना प्रशासनाने व्यावसायिकांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नाेटिसा बजावल्या आहेत़

 

कडक निर्बंध असताना सुनावणी कशी?

काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करीत मनपाने २४ व २५ मे राेजी सुनावणीसाठी व्यावसायिकांना नाेटिसा दिल्या आहेत़ मनपात व्यावसायिकांच्या गर्दीमुळे काेराेनाच्या संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही़

 

८ जून राेजी न्यायालयात सुनावणी

याप्रकरणी बहुतांश सर्वच व्यावसायिकांनी स्थानिक दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत़ याविषयी ८ जून राेजी न्यायालयात सुनावणी हाेणार आहे़ न्यायालयात बाजू मांडल्यानंतर न्यायालयाची भूमिका समजून घेण्यापूर्वीच मनपाकडून दुकाने हटविण्यासाठी सुनावणी घेतली जात असल्याने प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित हाेत आहेत़

 

 

जाेपर्यंत जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना पर्यायी जागा दिल्या जात नाही, किंवा यावर ठाेस ताेडगा निघत नाही,ताेपर्यंत मनपाच्या काेणत्याही कार्यवाहीला आमचा तीव्र विराेध राहणार आहे़ त्यावेळी निर्माण हाेणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला आयुक्त जबाबदार राहतील़

- साजीद खान पठाण, विराेधी पक्षनेता, मनपा

Web Title: Notices to the traders in the public vegetable market in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.