Akola: कुख्यात गुंड पप्या खानला ‘एमपीडीए’चा दणका, जिल्हा पाेलिस अधीक्षकांची गावगुडांवर वक्रदृष्टी

By आशीष गावंडे | Published: May 21, 2024 10:46 PM2024-05-21T22:46:38+5:302024-05-21T22:46:58+5:30

Akola Crime News: शहरात मारामाऱ्या करणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळणे व दहशत निर्माण करणाऱ्या गावगुडांवर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची वक्रदृष्टी पडल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे.

Notorious gangster Papaya Khan hit by 'MPDA', District Police Superintendent's crooked view on villages | Akola: कुख्यात गुंड पप्या खानला ‘एमपीडीए’चा दणका, जिल्हा पाेलिस अधीक्षकांची गावगुडांवर वक्रदृष्टी

Akola: कुख्यात गुंड पप्या खानला ‘एमपीडीए’चा दणका, जिल्हा पाेलिस अधीक्षकांची गावगुडांवर वक्रदृष्टी

- आशिष गावंडे 
अकोला - शहरात मारामाऱ्या करणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळणे व दहशत निर्माण करणाऱ्या गावगुडांवर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची वक्रदृष्टी पडल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. जुने शहरातील हमजा प्लाॅट येथील कुख्यात गुंड शाकीर खान उर्फ पप्या अहेमद खान (२६)याच्याविराेधात ‘एमपीडीए’नुसार कारवाइ करीत त्याला एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाइ मंगळवारी पाेलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जुने शहर पाेलिसांनी केली. 

जुने शहरातील हमजा प्लाॅट येथील कुख्यात गुंड शाकीर खान उर्फ पप्या अहेमद खान (२६)याच्याविराेधात यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी दूखापत करणे, भूखंड, घरांवर अतिक्रमण करणे, चोरी करणे, बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणे,जीवे मारण्याची धमकी देणे असे विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करून ताे जुमानत नव्हता. त्यामुळे कुख्यात शाकीर खानला स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पाेलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी ६ मे राेजी मंजूरी दिली हाेती. ही कारवाइ ‘एसपी’सिंह यांच्या निर्देशानुसार ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, ‘पीएसआय’आशिष शिंदे, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय शुक्ला तसेच जुने शहर पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, ‘एपीआय’रविंद्र लांडे यांनी केली. 

आराेपी झाला हाेता फरार
पाेलिस यंत्रणेने आपल्या विराेधात ‘एमपीडीए’ची कारवाइ केल्याची कुणकुण लागताच कुख्यात गुंड शाकीर खान फरार झाला हाेता. परंतु पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत २१ मे राेजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. आराेपीला अटक केल्यापासून त्याच्या स्थानबध्दतेचा कालावधी सुरू झाला आहे. पाच महिन्यांत ‘एमपीडीए’अंतर्गत तब्बल १४ जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे,हे येथे उल्लेखनिय.

सर्वसामान्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवणे, खंडणी उकळणे,परिसरात दहशत निर्माण करणे व भूखंड हडपणाऱ्या गावगुंडांनी वेळीच त्यांच्या कृतीला पायबंद घालावा. अन्यथा कारवाइ हाेणारच,हे गृहीत धरावे. 
-बच्चन सिंह,जिल्हा पाेलिस अधीक्षक

Web Title: Notorious gangster Papaya Khan hit by 'MPDA', District Police Superintendent's crooked view on villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.