मूर्तिजापूरातील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 07:43 PM2021-05-25T19:43:27+5:302021-05-25T19:43:32+5:30

Murtijapur Crime News : शराफत अली बरकतअली, वय २६ वर्ष, याला एम पी डी ए कायद्यांतर्गत एकवर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.     

Notorious goons in Murtijapur lodged for one year | मूर्तिजापूरातील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबध्द

मूर्तिजापूरातील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबध्द

Next

मूर्तिजापुर : शहरातील पठाणपुरा, येथील कुख्यात गुंड शराफत अली बरकतअली, वय २६ वर्ष, याला एम पी डी ए कायद्यांतर्गत एकवर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.     
               शराफत अली याचे वर यापुर्वी जबर दुखापत, दंगल, बेकायदेशिर रित्या शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, गृहअतीकमण, प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती,   त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड
शराफत अली बरकत अली, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव  जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी, जितेंद्र पापळकर यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच  त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.२५ मे रोजी पारीत केला. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांचे आदेशावरून शराफत अली याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले आहे. सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, मोनिका राउत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राउत स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, नापोकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. मूर्तिजापुर शहर येथील पोलीस निरीक्षक सचिन यादव, पोउपनि आशिष शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Notorious goons in Murtijapur lodged for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.