ऑनलाईन नोंदणीनंतरच आता कायमस्वरुपी वाहन चालक परवाना
By admin | Published: November 30, 2014 10:25 PM2014-11-30T22:25:14+5:302014-11-30T22:25:14+5:30
१ डिसेंबरपासून राज्यभर अंमलबजावणी.
वाशिम : वाहन व चालकांच्या सुरक्षिततेसाठी नवनवे उपक्रम अंमलात आणणार्या प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ परवान्यानंतर (लर्निंग लायसन्स) आता वाहन चालविण्याचा कायमस्वरुपी परवाना (परमनन्ट लायसन्स) देण्यापूर्वी ऑनलाईन नावनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
रस्ते अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्याच्यादृष्टिने, चालकांकडून वाहतूक नियमांची उजळणी करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ऑनलाईन चाचणी परीक्षा अगोदरच सुरू केली आहे. ही परीक्षा देण्यासाठी प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उमेदवारांची गर्दी होते. परिणामी, अनेकांना कार्यालयात ताटकळत राहावे लागते. लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकरिता उमेदवारांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होऊ नये, यासाठी राज्यभरात १ सप्टेंबरपासून ह्यऑनलाईन अपॉईन्टमेंटह्णची सुविधा अंमलात आणण्यात आली. लर्निंग लायसन्ससाठी ह्यऑनलाईन अपॉईन्टमेंटह्णचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, परमनन्ट लायसन्सच्या परीक्षेसाठीही हीच पद्धत लागू करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या विचाराधीन होता. त्यानुसार परमनन्ट लायसन्सच्या परीक्षेसाठीही ऑनलाईन नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यभरात १ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
ऑनलाईन नावनोंदणीद्वारे परमनन्ट लायसन्ससाठी द्याव्या लागणार्या परीक्षेची तारीख व वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना बहाल करण्यात आले आहे. ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनाच परमनन्ट लायसन्सची परीक्षा देता येणार आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांना परिवहन कार्यालयात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सकाळी १0 ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १ व दुपारी १ ते २ अशा चार वेळेत परीक्षा देण्याचा पर्याय अर्जदारांना निवडता येणार आहे.
*अशी करावी नोंदणी..
ह्यडब्लूडब्लूडब्लू.सारथी.एनआयसी.इन या संकेतस्थळावर जावून ह्यइश्यू ऑफ परमनन्ट लायसन्स टू मीह्ण हा पर्याय अर्जदाराने निवडावा. हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनवर उपलब्ध झालेल्या अर्जात संपूर्ण माहिती भरावी. तसेच, उजव्या बाजुला अर्ज क्रमांक (अँप्लिकेशन नंबर) असल्याची खात्री करुन तो लिहून घ्यावा व नंतर त्या क्रमांकाने अर्जातील माहिती भरावी. सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या सोयीची तारीख व वेळ निवडण्याची मुभा अर्जदाराला राहणार आहे.