आता अकोलेकरांना होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा

By रवी दामोदर | Published: May 25, 2024 08:05 PM2024-05-25T20:05:25+5:302024-05-25T20:05:35+5:30

काटेपूर्णा धरणामध्ये केवळ १७.९० टक्के जलसाठा : बाष्पीभवन वाढले

Now Akolekars will get water supply every five days | आता अकोलेकरांना होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा

आता अकोलेकरांना होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा

अकोला : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशाच्या पार गेला असून, राज्यात सार्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये बाष्पीभवनामुळे जलसाठा कमी होत आहे. अकोलेकरांची तहान भागविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ १७.९० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने महानगरपालिका प्रशासनाद्वारा अकोला शहरात चार दिवसा आड होणाऱ्या पाणी पुरवठ्यात एक दिवसाने वाढ करण्‍यात आली आहे. 

आता सोमवार दि. २७ मे २०२४ पासून संपुर्ण शहराला पाच दिवसा आड पाणी पुरवठा करण्‍यात येणार असल्‍याबाबत मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये महान धरणातून पाणी पुरवठा करण्‍यात येत असते. महान धरणात आजरोजी १७.९० टक्‍के जलसाठा शिल्‍लक असून, मोठ्या प्रमाणात बाष्‍पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा आता पाच दिवसाआड होणार आहे. शहरातील नगरिकांनी याची नोंद घेऊन पिण्‍याचे पाणी काट कसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारा करण्‍यात येत आहे.

Web Title: Now Akolekars will get water supply every five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला