आता ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:16 PM2019-07-02T12:16:30+5:302019-07-02T12:16:39+5:30

अपार्टमेंटमधील सर्वच रहिवाशांना स्वतंत्र नळ जोडणी न देता यापुढे ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Now 'an apartment-a tap connection' ´in Akola | आता ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’

आता ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’

googlenewsNext

अकोला: विद्युत मोटरीद्वारे पाण्याचा अनिर्बंध वापर करणाऱ्या रहिवासी अपार्टमेंटमधील सुज्ञ अकोलेकरांवर महापालिका प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारला आहे. अपार्टमेंटमधील सर्वच रहिवाशांना स्वतंत्र नळ जोडणी न देता यापुढे ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आजरोजी स्वतंत्र नळ जोडणी असल्यास ती रद्द करण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मनपाच्यावतीने शहरातील विविध भागात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. काही परिसरात जलवाहिनी टाकून नागरिकांना नळ कनेक्शन दिल्यानंतरही त्यांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याच्या असंख्य तक्रारी समोर येत आहेत. जलवाहिनीवरील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी मनपाकडून किमान तीन तास पाणीपुरवठा सुरू ठेवला जातो. परिणामी त्या-त्या परिसरातील नागरिकांकडून इतर गरजू नागरिकांचा कवडीचाही विचार न करता वाहने धुणे, अंगणात पाणी शिंपडण्यासाठी पाण्याचा अपव्यय केला जातो. रहिवासी अपार्टमेंटमध्ये स्वतंत्र नळ जोडण्या असल्यामुळे विद्युत मोटरीद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे त्याच भागातील इतर नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी लक्षात घेता रहिवासी अपार्टमेंटमधील रहिवाशांना यापुढे ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ देण्याचा निर्णय जलप्रदाय विभागाने घेतला आहे.

टाक्यातून करा उपसा!
रहिवासी अपार्टमेंटमधील मालमत्ताधारकांनी स्वतंत्र नळ जोडणी रद्द करावी लागेल. एकाच नळ जोडणीद्वारे टाक्यात पाणी जमा केल्यानंतर त्याचा विद्युत मोटरीने सामुहिक उपसा करता येणार आहे. स्वतंत्र नळ जोडणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. मालमत्ताधारकांची संख्या लक्षात घेता किती व्यासाच्या नळ कनेक्शनची गरज आहे, यासंदर्भात मनपाच्या निर्देशानुसार नळ जोडणी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरातील सर्व अपार्टमेंटमधील मालमत्ताधारकांनी पुढील आठ दिवसात सामूहिक नळ कनेक्शन घेण्याबाबत जलप्रदाय विभागामध्ये संपर्क साधावा. प्राप्त अर्जानुसार नळ जोडणी दिली जाईल. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान कारवाईचा पर्याय खुला आहे.
- सुरेश हुंगे कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग, मनपा

 

Web Title: Now 'an apartment-a tap connection' ´in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.