आता ऑनलाइननेच भाजपा सरकार घरी पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:33 PM2017-10-09T20:33:00+5:302017-10-09T20:33:43+5:30

तेल्हारा : उडीद, मूग पिकाचे हमीभाव खरेदी करण्यासाठी भाजप  सरकारने ऑनलाइन अर्ज करण्याचे ठरविले आहे. सरकारने  आता ऑनलाइन शेतकर्‍यांना रांगेत उभे करण्याचे ठरविले  आहे. जेवढा वेळ पती-पत्नी यांना ऑनलाइन पीक कर्जाच्या  अर्जासाठी दिला तेवढा वेळ स्वत:च्या लग्नातसुद्धा उभे राहिले  नाही. एवढी बिकट परिस्थिती सरकारने शेतकर्‍यांवर आणली  आहे,असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू  कडू यांनी केले.  तेल्हार्‍यात भव्य रोगनिदान शिबिर व शेतकरी  मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या  मेळाव्यात ते बोलत होते. 

Now the BJP government should go home online | आता ऑनलाइननेच भाजपा सरकार घरी पाठवा

आता ऑनलाइननेच भाजपा सरकार घरी पाठवा

Next
ठळक मुद्देप्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू तेल्हार्‍यात रोगनिदान शिबीर, शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : उडीद, मूग पिकाचे हमीभाव खरेदी करण्यासाठी भाजप  सरकारने ऑनलाइन अर्ज करण्याचे ठरविले आहे. सरकारने  आता ऑनलाइन शेतकर्‍यांना रांगेत उभे करण्याचे ठरविले  आहे. जेवढा वेळ पती-पत्नी यांना ऑनलाइन पीक कर्जाच्या  अर्जासाठी दिला तेवढा वेळ स्वत:च्या लग्नातसुद्धा उभे राहिले  नाही. एवढी बिकट परिस्थिती सरकारने शेतकर्‍यांवर आणली  आहे,असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू  कडू यांनी केले.  तेल्हार्‍यात भव्य रोगनिदान शिबिर व शेतकरी  मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या  मेळाव्यात ते बोलत होते. 
  या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून संस्थापक आमदार बच्चू  कडू तर अध्यक्षस्थानी मूलचंद राठी हे होते. मंचावर प्रहार  जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेश पाटील खारोडे,  जनार्दन पाटील, शंभुराजे मालक्षणे, विठ्ठलराव खारोडे, दत्ता  महाराज पागधुणे, बाळाभाऊ शेरेकर, डॉ. अभय पाटील, डॉ.  अनंत शेवाळे, विक्की मल्ल, शेखर भुजबले हे उपस्थित होते. इथे  उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मोठय़ा ऑपरेशनची,  शस्त्रक्रियेची गरज भासल्यास पूर्ण खर्च प्रहार संघटना करेल,  असे बच्चू कडू यांनी रुग्णांना आवाहन केले. शिबिरात  आलेल्या रुग्णांना ५0 हजारांचे औषधे डॉ. अभय पाटील यांनी  स्वखर्चाने आणले. नेत्र तपासणी झालेल्या २00 रुग्णांना चष्मे  वाटप मारवाडी युवा मंच अकोला यांच्या वतीने मोफत देण्यात  आले. रोगनिदान शिबिरात डॉ. अभय पाटील, डॉ. रेखाताई  पाटील, डॉ. अनंत शेवाळे, डॉ. गौरव शिंदे, डॉ. संदीप चव्हाण,  डॉ. अभिजित नालट, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. किशोर ढोणे,  डॉ. नितीन पाटील, डॉ. राजेश चिंचोळकर आदींनी सेवा दिली.  तसेच डॉ. सचिन ठाकरे यांची रक्तपेढीची चमू उपस्थित होती.

Web Title: Now the BJP government should go home online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.