आता प्रत्येक शुक्रवारी अकोला आगारात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:59 AM2017-10-02T01:59:31+5:302017-10-02T02:00:39+5:30

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला  आगार क्रमांक दोनच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पुढाकारात या पुढे दर शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात  आला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी केली  गेली.

Now every Friday Akola Agro Sanitation Campaign | आता प्रत्येक शुक्रवारी अकोला आगारात स्वच्छता अभियान

आता प्रत्येक शुक्रवारी अकोला आगारात स्वच्छता अभियान

Next
ठळक मुद्देआगार क्रमांक दोनच्या अधिकारी-कर्मचा-यांचा पुढाकारनिर्णयाची अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला  आगार क्रमांक दोनच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पुढाकारात या पुढे दर शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात  आला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी केली  गेली.
अकोला आगार क्रमांक दोन अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी  शुक्रवारी सकाळी बसस्थानक परिसरातील घाण साफ केली.  परिसरात आणि प्लॅटफार्मवरील कचरा उचलून फेकला.  परिसरात झाडू लावून प्रवाशांना, स्वच्छतेच्या जनजागृतीचे धडे  दिलेत. या स्वच्छता अभियान मोहिमेत अकोला परिवहन  महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहण पलंगे, विभागीय वाहतूक  अधिकारी  योगेश ठाकरे, सांिख्यकी अधिकारी एस.ई.  शेगोकार,  अभियंता सिसोदिया, जी.व्ही. थोरात, सविता  नागवंशी, वा.नी. वासनिक, हाडोळे, तामणे, अकोला आगार  क्रमांक दोनचे व्यवस्थापक अरविंद पिसोडे, वाहतूक निरीक्षक  इंगळे, डी.एम. गव्हाळे, उजडे आदी विभागीय कार्यालयातील  आणि आगारातील अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित हो ते.

Web Title: Now every Friday Akola Agro Sanitation Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.