आता वर्षभरात चारच ग्रामसभा

By admin | Published: January 26, 2015 12:43 AM2015-01-26T00:43:12+5:302015-01-26T00:44:35+5:30

शासन निर्णयाची २६ जानेवारीपासून अंमलबजावणी.

Now four gram sabha in the year | आता वर्षभरात चारच ग्रामसभा

आता वर्षभरात चारच ग्रामसभा

Next

मयूर गोलेच्छा / लोणार (जि. बुलडाणा):
ग्राम विकासासह विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने वर्षभरात सहा ग्रामसभा घेण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत करण्यात आली आहे; परंतु ग्रामस्थांची अनुपस्थिती व ग्रामपंचायतची उदासीनता लक्षात घेऊन राज्य शासनाने वर्षभरात चार ग्रामसभा घेण्याचे सूचित केले असून, या निर्णयाची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होणार आहे.
राज्य शासनाने ग्रामपंचायतींना महिला सभा घेण्याचीही शिफारस केली आहे. महिलांच्या या सभेतील महत्त्वपूर्ण शिफारसी ग्रामसभेत ठेवण्याची नवी तरतूद अधिनियमात करण्यात आली असल्याने या दुरुस्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामसभेपूर्वी प्रभागनिहाय सभा घेण्याची यापूर्वीची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. वैयक्तिक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड या सभांमध्ये करता येणार आहे. त्याचबरोबर महिला सबलीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या स्वतंत्र सभेचे अधिकार अबाधित ठेवण्यात आले आहेत.
वर्षभरात घेतल्या जणार्‍या सहा ग्रामसभा आता चारवर येऊन ठेपल्या असून, त्याही ग्रामपंचायत किती गंभीरतेने घेते, हे महत्त्वाचे आहे. वर्षभरात २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट आणि आर्थिक वर्षाची एप्रिल महिन्यात होणारी सभा, अशा एकूण चार ग्रामसभा होणार आहेत.

Web Title: Now four gram sabha in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.