आता यंत्राणे काढता येईल हरभरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:48 PM2020-01-14T15:48:58+5:302020-01-14T15:49:08+5:30
मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आलेल्या या जातीचा लवकरच संपूर्ण देशात प्रसार होईल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला: आता यंत्राने हरभरा (हार्वेस्ट) काढता येणार आहे. काढणीसाठीचा शेतकऱ्यांचा खर्चही कमी होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन करू न त्यासाठीची ‘पीडीकेव्ही कनक’ ही नवीन हरभºयाची जात विकसित केली आहे. मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आलेल्या या जातीचा लवकरच संपूर्ण देशात प्रसार होईल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.
रब्बी हंगामात राज्यात गहू पिकासोबत हरभरा पिकांची पेरणी केली जाते; परंतु हे पीक (हार्वेस्ट) काढण्यासाठी वेळेवर शेतमजूर मिळत नसल्याने शेतातून माल काढण्यास विंलब होतो. परिणामी, पिकांचे नुकसान होत असते. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पिके यंत्राने काढता यावी, यासाठीचे बियाणे संशोधन हाती घेतले आहे. हरभरा हे रब्बी हंगामातील विदर्भातील प्रमुख पीक आहे. हे पीक यंत्राने काढता यावे, यासाठी ‘पीडीकेव्ही कनक’ ही जात विकसित केली आहे. या हरभरा झाडाला ३० सें.मी.च्यावर घाटे लागतात. ११० ते ११५ दिवसांत येणारी ही जात असून, उत्पादन हेक्टरी १८ ते २० क्ंिवटल मिळणार आहे. या हरभºयाचा आकार व वजन हे जॅकी हरभºयाप्रमाणेच आहे; पण हे पीक यंत्राने (हार्वेस्ट) काढता येते. विशेष म्हणजे, हार्वेस्ट काढताना नुकसान होत नाही आणि क ाढणीचा खर्चही कमी येतो. असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. राज्यस्तरीय संशोधन (अॅग्रोस्को)आढावा समितीने या हरभरा जातीला मान्यता दिली आहे. कर्नाटक, गुजरात व महाराष्टÑ मध्य भारतातील या तीन राज्यांसाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे; परंतु जॅकी या हरभऱ्यांच्या जातीप्रमाणे ‘पीडीकेव्ही कनक’ या जातीचा प्रसार होईल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
आता यंत्राने हरभरा काढता येणार असून, त्यासाठीच ‘पीडीकेव्ही कनक’ हरभरा जात विकसित करण्यात आली आहे. यामुळे शेतकºयांचा काढणी खर्चही कमी होईल. हे सर्वोकृष्ट संशोधन असल्याने हरभºयाची ही जात देशात लोकप्रिय होईल.
- डॉ. एन. आर. पोेटदुखे,
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ,
कडधान्य विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.