आता रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक

By admin | Published: March 20, 2015 12:25 AM2015-03-20T00:25:46+5:302015-03-20T00:25:46+5:30

आरक्षित आणि अनारक्षित तिकीटधारकांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासन सतर्क.

Now helpline number on train tickets | आता रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक

आता रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक

Next

अकोला : रेल्वे प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्याविषयी व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून आरक्षित तथा अनारक्षित रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक पिंट्र करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बुधवार, १८ मार्च रोजी दिल्ली येथे केली. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, सुरक्षा, आपत्कालीन चिकित्सा, स्वच्छता, जेवण, कोचमधील अव्यवस्था आदींबाबत माहिती आणि तक्रार नोंदविण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आलेले हेल्पलाइन क्रमांक रेल्वे तिकिटांवर दिसणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेखातर भारतीय रेल्वे प्रशासनाने राष्ट्रीय स्तरावर सुरू केलेले विविध हेल्पलाइन क्रमांक लवकरच आरक्षित तथा अनारक्षित तिकिटांवर झळकणार आहेत. रेल्वेद्वारे सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकांबाबत बहुतांश प्रवासी अनभिज्ञ असतात, असे रेल्वे प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. सेवा-सुविधा उपलब्ध असतानादेखील त्याचा योग्य आणि प्रभावी उपयोग प्रवाशांकडून न केला जाण्याची कारणे अनेक असली तरी, हेल्पलाइन क्रमांकच माहीत नसणे हे प्रमुख कारण प्रकर्षाने या सर्वेक्षणात समोर आले असल्याचे स्पष्ट करीत रेल्वे प्रशासनाने १ एप्रिलपासून देशभरातील सरसकट सर्व प्रकारच्या रेल्वे तिकिटांवर राष्ट्रीय स्तरावर रेल्वेद्वारे चालविले जाणारे हेल्पलाइन क्रमांक प्रिंट केलेले दिसतील. यामध्ये ऑल इंडिया पॅसेंजर हेल्पलाइन क्रमांक १३८, गाड्यांच्या आवागमनाबाबत सूचना देणारा हेल्पलाइन क्रमांक १३९, प्रवाशांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला १८२ क्रमांक रेल्वे तिकिटांवर अंकित राहणार आहे. तिकिटाच्या मागच्या भागात ठळकपणे दिल्या जाणार्‍या या माहितीसह प्रवासादरम्यान आपले मूळ ओळखपत्र सोबत बाळगण्याची सूचनादेखील केली जाणार आहे. या बदलाबाबतचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या भोजन व्यवस्थापन आणि पर्यटन निगम (आयआरसीटीसी) यांना दिले असून, त्यानुसार त्यांनादेखील एसएमएसवर आणि ई-तिकिटांद्वारा हे बदल रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहचविण्याचा सूचना आहेत.

Web Title: Now helpline number on train tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.