आता सरकारी बगिचा नव्हे, मा. बाळासाहेब ठाकरे उद्यान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:32 AM2020-12-13T04:32:51+5:302020-12-13T04:32:51+5:30
शहरात डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या उद्यानामध्ये मागील काही दिवसांपासून साैंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ ...
शहरात डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या उद्यानामध्ये मागील काही दिवसांपासून साैंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ आ. गाेवर्धन शर्मा यांना शासनाकडून प्राप्त निधीतून उद्यानातील विकासकाम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या उद्यानाला शिवसेना सुप्रीमाे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी सेनेचे विधानपरिषद सदस्य गाेपीकिशन बाजाेरिया यांनी पुढाकार घेत यासंदर्भात राज्यपाल यांच्यासाेबत पत्रव्यवहार केला. या पत्राची दखल घेत राज्य शासनाने विषयी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश पीडीकेव्ही प्रशासनाला दिले हाेते. त्यानुसार ११ डिसेंबर राेजी पीडीकेव्ही प्रशासनाने नामकरणाच्या प्रस्तावावर कार्यकारी परिषदेच्या सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणली. चर्चेअंती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या देखभाली अंतर्गत असलेल्या उद्यानाला ‘मा. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, पीडीकेव्ही अकाेला संचलित’असे नाव देण्याला मंजुरी देण्यात आली.
सरकारी बगिच्याला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसैनिक आग्रही हाेते. त्यांच्या भावना लक्षात घेता नामकरणासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला. पीडीकेव्हीच्या कार्यकारी परिषदेने यावर शिक्कामाेर्तब केले आहे.
- गाेपीकिशन बाजाेरिया विधानपरिषद सदस्य