पाेलिस आइसाेबत आता राेज गमाडी गंमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:48+5:302021-09-27T04:20:48+5:30
अकाेला : राज्यातील महीला पाेलिस कर्मचाऱ्यांच्या डयुटीचे तास चार तासांनी कमी करून केवळ आठ तास केल्याने या महीला पाेलिस ...
अकाेला : राज्यातील महीला पाेलिस कर्मचाऱ्यांच्या डयुटीचे तास चार तासांनी कमी करून केवळ आठ तास केल्याने या महीला पाेलिस कर्मचाऱ्यांना आता कुटुंबासाठी काही वेळ देता येणार आहे़ या निर्णयाचा पाेलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या मुलांनी तर आइसाेबत आता राेजच चांगला वेळ घालवता येणार असल्याचे वास्तव आहे़ राज्यातील पाेलिस दलात कार्यरत असलेल्या महीला पाेलिस कर्मचाऱ्यांना १२ तासांची डयुटी अनिवार्य हाेती़ या डयुटीमूळे महीला पाेलिसांना घरी वेळ देणे शक्य नसल्याचे अनेक उदाहरन समाेर आले़ काहींचे कुटुंबात वादही झाल्याने या प्रकरणाची माहीती राज्याच्या वरीष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांकडे गेली़ त्यानंतर महीला पाेलिसांच्या डयुटीचे तास कमी करण्यासाठी मंथन झाल्यानंतर पाेलिस महासंचालक संजय पांडे यांनी महीला पाेलिसांची डयुटी आता चार तासांनी कमी करून केवळ आठ तास केली आहे़ त्यामुळे महीला पाेलिसांना आता कुटुंबाला वेळ देता येणार आहे़
जिल्हयातील एकून पाेलिस ठाणे
२३
जिल्हयातील एकून पाेलिस कर्मचारी
२४६५
जिल्हयातील महीला पाेलिस
२६५
आता आइसाेबत राेज खेळता येणार
आइची डयुटी १२ तासांपेक्षा अधिक हाेते़ कधी कधी तर आइला दाेन दिवस पाहणे शक्य हाेत नाही़ बंदाेबस्त कींवा इतर महत्वाच्या कामात आइ अडकली तर आइची भेट हाेत नाही़ आइच्या डयुटीचे तास कमी झाल्याचा निर्णय खुप चांगला असून त्यामूळे आइसाेबत खेळायला वेळ मीळणार आहे़
कल्याणी इंगळे
काेराेनाच्या काळात संपुर्ण देश बंद असतांना माझी आइ रस्त्यावर डयुटी देत हाेती़ आइला काही हाेइल अशी भीती मनात नेहमीच हाेती़ १२ तासांपेक्षा अधिक डयुटी असल्याने आइला भेटनेही शक्य नव्हते़ मात्र आता डयुटीचे तास कमी झाल्याने आइसाेबत गमाडी गंमत करायला मीळणार आहे़
आदीत्य धनभर
महीला पाेलिस असतांनाही आइ पुरुष पाेलिसांच्या एवढीच डयुटी करीत आहे़ तीला घरातील सर्व कामे करून बाहेरील डयुटी करणे माेठे अडचणीचे आहे़ मुलांनाही वेळ देणे आइसाठी शक्य हाेत नव्हते़ मात्र आता डयुटीचे तास कमी झाल्याने आइ आम्हाला वेळ देइल अशी आशा आहे़
प्रणिल गावंडे