आता महापालिका हेच आमचे घर....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:43+5:302021-06-22T04:13:43+5:30
शहरात चार वर्षांपासून घरकुलाचे काम बंद असून, लाभार्थी घरकुलांपासून वंचित आहेत. शहरात गुंठेवारी प्लॉटवर २,५०० घरकूल मंजूर झाली आहे. ...
शहरात चार वर्षांपासून घरकुलाचे काम बंद असून, लाभार्थी घरकुलांपासून वंचित आहेत. शहरात गुंठेवारी प्लॉटवर २,५०० घरकूल मंजूर झाली आहे. परंतु आतापर्यंत १० टक्केही घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. घरकुलांसाठी महापालिका प्रशासनाकडे २५ कोटी रूपयांचा निधी पडून आहे. शासनाने घरकूल बांधकामासाठी परवानगी सुद्धा दिली आहे. तसेच पालकमंत्री बच्चू कडू यांनी महापालिका व नगररचना विभागाला गुंठेवारी घराबाबत तातडीने निर्णय घेण्यास बजावले आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नाही. लाभार्थी चार वर्षांपासून घरकुलांपासून वंचित आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी प्रहार सेवक मनोज पाटील यांच्या नेतृत्वात लाभार्थींना आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शेकडो घरकूल लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.
फोटो :