आता मिळणार ‘रेड राइस’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:43 PM2019-06-09T13:43:52+5:302019-06-09T13:43:58+5:30
अकोला : लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेल्या ‘साकोली रेड राइस’ धान वाणाचे पहिले संशोधन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे.
अकोला : लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेल्या ‘साकोली रेड राइस’ धान वाणाचे पहिले संशोधन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे. यावर्षी हे वाण पूर्वप्रसारित करण्यात आले असून, हेक्टरी ४५ क्ंिवटल उत्पादनाचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. प्रात्यक्षिकानंतर पुढच्या वर्षी हे वाण रोवणीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.
विदर्भात धानाचे ८ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र असून, हे क्षेत्र राज्याच्या तुलनेत ५२ टक्के आहे. याच अनुषंगाने या कृषी विद्यापीठाने विविध तांदळाचे (धान) वाण विकसित केले. साकोली रेड राइस हा त्याचाच एक भाग आहे. यात गर्भवती महिलांसाठी लागणारे पोषक जस्त व लोह जीवनसत्त्व प्रमाण भरपूर आहे.
रेड राइस बारीक लालसर दाण्याचा आहे. वाणाचा दाणा आखूड असून, दाण्याचे वजन १७.७ गॅ्रम आहे. १३५ दिवसांत येणारे वाण असून, उत्पादकता हेक्टरी ४५ क्ंिवटल आहे. कृषी विद्यापीठाचे डॉ. जी. आर. श्यामकुवर व डॉ. पी. जी. शेंडे यांनी या वाणावर संशोधनाचे काम केले आहे. यावर्षीच्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त कृषी संशोधन आढावा सभेत या वाणाचे पूर्वप्रसारण करण्यात आले. यावर्षी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर रेड राइसचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. कृषी विद्यापीठाचे सध्या सात क्ंिवटल बियाणे प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी हवे असल्यास या वाणाचे बियाणे उपलब्ध केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, बारीक दाण्याचे पहिले लालसर वाण कृषी विद्यापीठाने विकसित केले.
- ‘साकोली रेड राइस’ धानाचे वाण यावर्षी विकसित करण्यात आले आहे. जस्त व लोहाचे प्रमाण भरपूर असलेल्या वाणाचे उत्पादन हेक्टरी ४५ क्ंिवटल आहे. प्रात्यक्षिकानंतर पुढच्या वर्षी शेतकºयांना हे वाण दिले जाईल.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.