आता सेकंदात माती परीक्षण
By admin | Published: December 8, 2014 01:05 AM2014-12-08T01:05:49+5:302014-12-08T01:05:49+5:30
डेव्हिड विनडॉर्फ यांचे संशोधन, कृषी विद्यापीठासोबत होणार करार.
राजरत्न सिरसाट /अकोला
माती परीक्षणाच्या पारंपरिक पद्धतीवर अमेरिकेने मात केली असून, उपग्रहाद्वारे सुमारे साठ सेकंदां तच परिपूर्ण अहवाल देणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेतकर्यांना शेतातील मातीचा सामू बघून कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, याचा ताळमेळ बसवून हमखास उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भात करण्यासाठीचा करार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत केला असल्याची माहिती अमेरिकेच्या टेक्सास विद्या पीठात कार्यरत या तंत्रज्ञानाचे जनक तथा कृषी विज्ञान आणि नैसर्गिक संसाधन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता (संशोधन) डॉ. डेव्हिड सी. विनडॉर्फ यांनी खास ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी डॉ. विनडॉर्फ अकोला येथे आले आहेत. याप्रसंगी माती परीक्षणाशिवाय शेती करू च नये, असे त्यांनी आर्वजून सांगितले.
प्रश्न- काय आहे माती परीक्षणाचे नवीन तंत्रज्ञान?
उत्तर - माती परीक्षणाचे हे एक्सआरएफ तंत्रज्ञान आहे. मातीचा प्रत्यक्ष नमुना न घेता त्यामध्ये कोणते मूलद्रव्य कमी आहेत, हे केवळ साठ सेकंदांत सांगता येते आणि तीन तासांत जवळपास १८0 मातीचे नमुने या तंत्रज्ञानाने काढण्यात येतात.
प्रश्न - शेतात प्रामुख्याने कोणत्या घटकांची कमतरता आढळते?
उत्तर - प्रामुख्याने शेतातील गंधक, जीप्सम आदी सर्वच घटकांसह मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये शोधली जातात.
प्रश्न- माती परीक्षण करणे गरजेचे आहे का ?
उत्तर - होय, माती परीक्षण केले, तर मातीचा सामू कळतो. मातीत कोणते गुणधर्म कमी आहेत, हे समजते आणि त्या उपाययोजना करू न कोणती खते वापरावीत, याचे नियोजन करता येते. त्यामुळे तुमचा योग्य ते उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा होतो.
प्रश्न- हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी किती कालावधी लागला ?
उत्तर - माती परीक्षणाचे तंत्रज्ञान आहेच, पण या नवीन यंत्राचा वापर वीस वर्षांंपूर्वी झाला होता. यामध्ये नवे संशोधन करण्यात आले असून, साठ सेकंदांत माती परीक्षणाचा अहवाल देण्याची सोय करण्यात आली आहे.
प्रश्न- जलतपासणीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो का ?
उत्तर - होय, जलतपासणीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची शुद्ध ता तपासली जाते. पाण्यात कोणती जड तत्त्वे,जलप्रदूषक आहेत, हे लगेच कळते. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होत असल्याने या तंत्रज्ञानाचा अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे.
प्रश्न - पाण्यात दूषित घटक कोणते असतात?
उत्तर - अनेक घटक आहेत. म्हणूनच या तंत्रज्ञानाद्वारे पाण्याची प्रत तपासली जाते. पाण्यातील हानिकारक तत्त्वे, सेंद्रिय कर्बाची माहिती क्षणार्धात कळते.
प्रश्न - या यंत्र तंत्रज्ञानाची किंमत किती आहे?
उत्तर - माती परीक्षण तंत्रज्ञान यंत्राची किंमत ४0 हजार यूएस डॉलर म्हणजेच भारतीय किम तीनुसार २0, ८0,000 रुपये असून, पाण्यातील सेंद्रिय कर्ब तपासणी यंत्राची किंमत ८0 हजार यूएस डॉलर आहे. विशेष म्हणजे, या यंत्रात कोणत्याही रसायनाचा वापर न करता माती आणि पाण्याची तपासणी केली जाते. या यंत्राचा वापर विदर्भात करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
*६0 सेकंदात अहवाल
अमेरिकेने उपग्रहाद्वारे सुमारे साठ सेकंदांतच परिपूर्ण अहवाल देणारे तंत्रज्ञान केले विकसित
याव्दारे मातीतील अन्नद्रव्य शोधली जातात. गंधक, जीप्सम आदी सर्वच घटकांसह मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांची मातीतील स्थिती समजल्यामुळे आवश्यक ते अन्नद्रव्य दिल्या जावू शकते.