आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम

By admin | Published: May 21, 2014 10:19 PM2014-05-21T22:19:52+5:302014-05-21T22:53:35+5:30

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला.

Now, the teacher shakes the election of the constituency | आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम

आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम

Next

अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल गेल्या १६ मे रोजी जाहीर झाले. त्यानंतर अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार या निवडणुकीची अधिसूचना २७ मे रोजी जाहीर होणार असून, ३ मे पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशपत्र दाखल करता येतील. दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी ४ जून रोजी होणार असून, ६ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. २० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होईल व सायंकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

.
*आचारसंहितेचे पालन करा; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश!
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे आचारसंहितेचे पालन करण्यात यावे, आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिले.

Web Title: Now, the teacher shakes the election of the constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.