आता रेती घाटांवर दहा टक्क्यांचा भार

By admin | Published: October 23, 2016 02:09 AM2016-10-23T02:09:55+5:302016-10-23T02:09:55+5:30

खनिज प्रतिष्ठान करणार उपाययोजना.

Now ten percent load on sand ghats | आता रेती घाटांवर दहा टक्क्यांचा भार

आता रेती घाटांवर दहा टक्क्यांचा भार

Next

अकोला, दि. २२- खनिज क्षेत्रातील पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेसाठी रे तीघाट आणि दगड खाणींवर आकारण्यात येणार्‍या स्वामित्वधनासोबतच आणखी दहा टक्के रक्कम वसूल करण्या त येणार आहे. ती जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावे जमा करा. १ सप्टेंबरपासून देण्यात आलेल्या सर्व परवानाधारकांकडून ती वसुली करण्याचे आदेश जिल्हा खणिकर्म अधिकारी डॉ. रामेश्‍वर पुरी यांनी गुरुवारी दिले.
खणिकर्म संचालकांच्या नागपूर येथे मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे, त्यामध्ये आधीचे परवानाधारकही घेतल्याने महसूल गोळा होण्याचे प्रमाण वाढणार आहे. जिल्हानिहाय खनिज प्र ितष्ठान स्थापन करण्याचे निर्देश १ सप्टेंबर २0१६ रोजीच्या अधिसूचनेत देण्यात आले. त्यामध्ये स्वामित्वधनाच्या दहा टक्के अतिरिक्त रक्क म संबंधितांकडून वसूल करण्याचे सांगितले; मात्र कालावधीबाबत स्पष्टता नव्हती. त्यासाठी खणिकर्म विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत ते स्पष्ट करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या नावे जमा होणारी स्वामित्वधनाची रक्कम खनिज पट्टय़ाच्या २0 किमी त्रिज्येच्या हद्दीत पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी रेतीघाट, दगड खाण परवानाधारकांकडून ती दहा टक्के तातडीने प्रतिष्ठानच्या नावे जमा करावी, असे आदेश सर्व उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

कार्यकारी मंडळ, व्यवस्थापकीय समितीची स्थापना
स्वामित्वधनाच्या दहा टक्के रकमेतून करावयाच्या कामांची निवड आणि ते पूर्ण करण्यासाठी मंडळ आणि समितीची रचना करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री राहतील. सदस्यांमध्ये तीन आमदार, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, खणिपट्टाधारकांचे पाच सदस्य राहणार आहेत. या समितीने सुचविलेली कामे करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचे कार्यकारी मंडळ काम करणार आहे. मंडळाचे सचिव म्हणून जिल्हा खणिकर्म अधिकारी काम पाहणार आहेत.

Web Title: Now ten percent load on sand ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.