कपाशीवर आता अमेरिकन लष्करी अळीचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:24 PM2019-04-09T12:24:25+5:302019-04-09T12:24:45+5:30
अकोला: गुलाबी बोंडअळी पाठोपाठ आता कपाशीवर अमेरिकन लष्करी अळीचा धोका वाढला आहे. सद्या या अळीने राज्यातील मका पिकावर बस्तान मांडल्याने कृषी विभागात खळबळ उडाली असून, पिकांवर लष्करासारखे आक्रमण करू न प्रचंड नुकसान करणाऱ्या ‘लष्करी’ चे कपाशीवर स्थलांतर होण्याची सर्वाधिक भिती असल्याने तातडीने व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाची धावपळ सुरू आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला: गुलाबी बोंडअळी पाठोपाठ आता कपाशीवर अमेरिकन लष्करी अळीचा धोका वाढला आहे. सद्या या अळीने राज्यातील मका पिकावर बस्तान मांडल्याने कृषी विभागात खळबळ उडाली असून, पिकांवर लष्करासारखे आक्रमण करू न प्रचंड नुकसान करणाऱ्या ‘लष्करी’ चे कपाशीवर स्थलांतर होण्याची सर्वाधिक भिती असल्याने तातडीने व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाची धावपळ सुरू आहे.
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना, परभणी, जळगाव व विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील मका,ज्वारी आणि ऊस या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. या अळीचे पतंग एका रात्रीत सुमारे १०० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करतात. तद्वतच लष्करी अळीच्या मादीची प्रजनन क्षमताही जास्त असून, मादी पतंग तिच्या जीवनक्रमात सुमारे एक ते दोन हजार अंडी घालण्याची क्षमता आहे. ही अळी झुंडीने पिकांवर आक्रमण करत असल्याने काही दिवसात संपूर्ण पीक फस्त करीत असल्याचे दिसून आले. कपाशीवरील गुलाबी अळीच्या पाचपट ही अळी नुकसान करीत असल्याने कृषी विभाग, विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांची झोप उडाली. मागील दोन वर्ष गुलाबी बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे नुकसान झाले. यातून कृषी विभाग, विद्यापीठ आणि शेतकरी सावरत नाही तोच ‘लष्करी’चा धोका निर्माण झाला. सध्या ही अळी मुख्यत्वे मका पिकावर आहे. तसेच ज्वारी व ऊस पिकांवरही प्रादुर्भाव दिसून आला. कपाशीवर ही अळी येण्याचा धोकाही सर्वात जास्त असल्याने कृषी विभाग,विद्यापिठांना आतापासूनन खबरदारी, उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे.
- कशी ओळखाल ‘लष्करी’
ही अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट ‘वाय’ आकाराची खूण असते व शरीराच्या शेवटून दुसºया बाजूस (सेग्मेंट) चौकोनी आकारात चार ठिपके दिसून येतात तसेच त्या ठिपक्यावर केसही आढळून येतात.
- राज्यातील मका, ऊस व ज्वारी पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून, ही अळी केव्हाही कापूस पिकांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मका पीक विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात घेतले जाते. त्यादृष्टीने आतापासूनच काळजी घेण्यात येत आहे.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.