आताचा काळ हा सर्वगुणसंपन्न असण्याचा - भगत सिंह कोश्यारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 03:08 PM2020-02-05T15:08:35+5:302020-02-05T15:11:55+5:30
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३४ वा दीक्षांत समारंभात राज्यपाल बोलत होेते.
अकोला : शिक्षण प्रणालीत बदल होत असून, विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न असावा असे नवीन शिक्षण धोरण येत आहे. सर्वच क्षेत्रात काम करता यावे असे विद्यार्थ्यांचे एकात्मीक व्यक्तीत्व असणे गरजेचे आहे. देशाला पुढे न्यायचे असेल तर आपली तपस्या,साधना,त्यागाची भूमिका असली पाहिजे तेव्हाच आपल्यातून कार्यक्षम नवे शास्त्रज्ञ,सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडतील असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी अकोला येथे विद्यार्थ्यांना केले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३४ वा दीक्षांत समारंभात राज्यपाल बोलत होेते. दीक्षांतपिठावर प्रमुख अतिथी म्हणून कृषीमंत्री दादाजी भुसे,कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष आदित्य कुमार मिश्रा तसेच डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले,कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची उपस्थिती होती.राज्यपालांच्याहस्ते ५० विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.पदवी व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांनाही त्यांनी सामुहिक पदवी प्रदान केली.कृषीमंत्री भूसे यांनी कृषी विषयात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना सुवर्णसह विविध ६४ पदके प्रदान केली.
राज्यपाल म्हणाले, प्रत्येक जण आज नोकऱ्यांच्या शोधात आहे.सत्तेत जे होते नंतर नाहीत असे विरोधी पक्षाचे नेतेही नोकºयांचा प्रश्न उपस्थित करीत आहेत.पण मला सांगायचे आहे , मी गरीब कुटुंबातील आहे. खेड्यातून अनवानी पायाने येवून शालेय शिक्षण पूर्ण केले. पदवी,पदव्यूत्तरपर्यंतचे शिक्षण स्वत: काम करू न पूर्ण केले,महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस यांचा आर्दश डोळयासमोर ठेवून आम्ही वाटचाल केली. म्हणूनच आज मी एका महत्वाच्या राज्याचा राज्यपाल आहे. ही क्षमता प्रत्येकात आहे. तुमच्यातही भावी राष्टÑपती दडला आहे.म्हणूनच प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात काम करता आले पाहिजे असे व्यक्तीत्व तयार होण्याची आजची खरी गरज आहे.आम्ही चंद्रयान मोहिम हाती घेतली,यावेळी यशस्वी झालो नाही पण आम्ही नक्कीच चंद्रावर यान पाठवू,त्यासाठी धेय्य निश्चित असल पाहिजे,कृषी क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी स्वामिनाथन होण्याचे स्वप्न बघून त्यादृष्टीने श्रम घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.