इमारतींचे अतिक्रमण पाडण्यासाठी आता मजुरांचा वापर

By admin | Published: March 22, 2017 02:33 AM2017-03-22T02:33:26+5:302017-03-22T02:33:26+5:30

चारही झोन अधिका-यांच्या दिमतीला प्रत्येकी २५ मजुरांचा ताफा.

Now the use of laborers for encroachment of buildings | इमारतींचे अतिक्रमण पाडण्यासाठी आता मजुरांचा वापर

इमारतींचे अतिक्रमण पाडण्यासाठी आता मजुरांचा वापर

Next

अकोला, दि. २१- जेसीबीच्या मदतीने इमारतींचा अनधिकृत भाग जमीनदोस्त केल्यानंतर आता इमारतीच्या वरच्या माळ्यांवरील बांधकाम पाडण्यासाठी मजुरांचा वापर केला जात आहे. चारही क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या दिमतीला प्रत्येकी २५ मजूर देण्यात आले असून, मंगळवारी दिवसभर मजुरांच्या माध्यमातून इमारतींचा अनधिकृत भाग तोडण्याची कारवाई करण्यात आली.
महापालिकेला नवीन ह्यडीसी रुलह्ण लागू झाल्यानंतर ऑटोडीसीआर प्रणालीनुसार मंजूर नकाशाप्रमाणेच बांधकाम करणे प्रशासनाला अपेक्षित आहे. जुन्या १८६ इमारतींचे अतिरिक्त बांधकाम न करण्याची सक्त ताकीद महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना दिली होती. सुधारित ह्यडीसी रुलह्ण लागू केल्यानंतरदेखील मंजूर ह्यएफएसआयह्णचे उल्लंघन करीत बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे १८६ इमारतींसह ज्या नवीन इमारतींचे बांधकाम नियमापेक्षा जास्त आढळून आले, अशा इमारतींचा भाग जमीनदोस्त करण्याचे आदेश आयुक्त अजय लहाने यांनी नगररचना विभागासह क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिले. जेसीबीच्या मदतीने इमारतींचा भाग तोडल्यानंतर इमारतीच्या पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या माळ्यावरील अतिरिक्त बांधकाम मजुरांच्या मदतीने पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी चारही क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या दिमतीला प्रत्येकी २५ मजूर उपलब्ध करून देण्यात आले. महापालिकेच्या भूमिकेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

Web Title: Now the use of laborers for encroachment of buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.