आता अनधिकृत बांधकामांवर मनपाचा ‘वॉच’

By admin | Published: December 14, 2015 02:40 AM2015-12-14T02:40:39+5:302015-12-14T02:40:39+5:30

आयुक्तांनी गठित केले पथक; बांधकाम विभागाकडे जबाबदारी.

Now watch the 'Watch' on unauthorized constructions | आता अनधिकृत बांधकामांवर मनपाचा ‘वॉच’

आता अनधिकृत बांधकामांवर मनपाचा ‘वॉच’

Next

आशीष गावंडे / अकोला : मंजूर नकाशानुसार बांधकाम होत नसेल किंवा मनपाच्या परवानगीशिवाय अनधिकृत बांधकाम उभारल्या जात असेल, तर संबंधित मालमत्ताधारकाविरोधात कारवाई करण्यासाठी महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी प्रभागनिहाय उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांच्या पथकाचे गठन केले आहे. अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित अभियंत्यांसह क्षेत्रीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मनपा क्षेत्रात व्यावसायिक इमारत, रहिवासी इमारत असो वा हक्काचे घर उभारण्यासाठी मनपाच्या नगर रचना विभागाची परवानगी आवश्यक ठरते. या विभागात नकाशा मंजूर केल्यानंतर इमारतीचे नियमानुसार बांधकाम होणे अपेक्षित आहे. शहरात नेमकी याउलट परिस्थिती आहे. नकाशा मंजुरीनुसार जागेच्या र्मयादित क्षेत्रफळावर बांधकाम न करता त्यापेक्षा तब्बल तीन पट, चार पट बांधकामे होतात. मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण दर्शवित नगर रचना विभागाकडून जबाबदारी झटक ण्याचा प्रयत्न होतो. काही महारथी मनपाची कोणतीही परवानगी न घेता, इमारतींचे बांधकाम उभारत असल्याची बाब समोर आली आहे. सिंधी कॅम्प परिसरात मन पाच्या परवानगीशिवाय तीन मजली व्यावसायिक उभारण्याचा प्रताप उघडकीस आला होता. अनधिकृत बांधकामांमुळे प्रशासनाला मूलभूत सुविधांची पूर्तता करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय नागरिकांमध्ये वाद होऊन तक्रारींचा निपटारा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यावर उपाय म्हणून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी प्रभागनिहाय होणार्‍या बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधकाम विभागाकडे जबाबदारी सो पवण्याचा निर्णय घेतला आहे. उपअभियंता व क निष्ठ अभियंत्यांना अशा बांधकामांचा शोध घेऊन ते तातडीने थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तशी पूर्वसूचना क्षेत्रीय अधिकार्‍यांना द्यावी लागेल. क्षेत्रीय अधिकार्‍यांनी कारवाई न केल्यास उ पअभियंता, कनिष्ठ अभियंत्यासह क्षेत्रीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणार आहे.

Web Title: Now watch the 'Watch' on unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.