अकोलेकरांना आता दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:23 PM2019-04-09T13:23:08+5:302019-04-09T13:23:15+5:30

अकोला: विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर मनपाच्या जलप्रदाय विभागाने सोमवारी भूमिका स्पष्ट केली. पिवळ््या रंगाच्या पाणीपुरवठ्याची समस्या निकाली काढल्या जात असून, संपूर्ण शहराला दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Now water supply to Akolekar every fourth day | अकोलेकरांना आता दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा

अकोलेकरांना आता दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा

Next

अकोला: विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर मनपाच्या जलप्रदाय विभागाने सोमवारी भूमिका स्पष्ट केली. पिवळ््या रंगाच्या पाणीपुरवठ्याची समस्या निकाली काढल्या जात असून, संपूर्ण शहराला दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
अकोलेकरांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी शहरवासीयांना पिवळ््या रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली. याप्रकरणी शिवसेनेने मनपा प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर जलप्रदाय विभागाची यंत्रणा कामाला लागली. महान येथील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे तसेच पाटबंधारे विभागाच्यावतीने कॅनॉलला पाणी सोडल्याने पिवळ््या रंगाच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. पाचवा व्हॉल्व्ह बंद केल्यास पाणीपुरवठ्याचा उपसा कमी होऊन त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात होण्याची शक्यता होती. या सर्व शक्यतांची पडताळणी केल्यानंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाने आता सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, अकोलेकरांना चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या भूमिकेमुळे अक ोलेकरांच्या मनात निर्माण झालेल्या शंका कुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे.

पाण्याची काटकसर करा!
शहरवासीयांना आता दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाईल. उन्हाळ््याचे दिवस लक्षात घेता नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करणे अपेक्षित आहे. रस्त्यावर पाणी शिंपडणे, गाड्या धुणे, नळाला मोटार लावून पाण्याचा अवास्तव उपसा करणे बंद करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

पाचवा व्हॉल्व्ह उघडल्याने धरणातील पाणी खरडल्या गेले. ही समस्या दूर करतेवेळी काही काळ पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यादरम्यान अकोलेकरांना सहाव्या किंवा सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे कोणतेही वेळापत्रक तयार नव्हते.
- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग, मनपा

 

Web Title: Now water supply to Akolekar every fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.