‘नरेगा ’ कामांचे नियोजन कोलमडले!
By admin | Published: March 12, 2017 02:30 AM2017-03-12T02:30:06+5:302017-03-12T02:30:06+5:30
यंत्रणांची उदासीनता; कामांच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह.
संतोष येलकर
अकोला, दि. ११- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राबबिण्यात येत असलेल्या 'समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण' योजनेत जिल्हय़ात विविध कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे; मात्र कामांच्या नियोजनाचा अहवाल अद्यापही यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे यंत्रणांच्या उदासीनतेत जिल्हय़ातील ह्यनरेगाह्ण कामांचे नियोजन कोलमडले असून, उद्दिष्टानुसार कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ प्रकारची कामे प्राधान्याने करण्यासाठी शासनामार्फत ह्यसमृद्ध महाराष्ट्र जनकल्याणह्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सन २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षांत सिंचन विहिरी, शेततळी, शौचालयांचे बांधकाम, फळबाग लागवड, शोषखड्डे, ग्राम सबलीकरण, व्हर्मी कंपोस्ट टाके, नाडेप टाके, रोपे निर्मिती, वृक्ष लागवड, गाव तलाव-पाणी साठय़ांचे नूतनीकरण व गाळ काढणे आणि जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. त्यानुषंगाने जिल्हय़ात यंत्रणानिहाय करावयाच्या कामांचे उद्दिष्ट गत नोव्हेंबरमध्ये ठरविण्यात आले आहे. उद्दिष्टानुसार कामे करण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेऊन कामांच्या नियोजनाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत जिल्हय़ातील संबंधित यंत्रणांना देण्यात आले; परंतु ह्यनरेगाह्ण अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांच्या नियोजनाचा अहवाल एकाही यंत्रणेकडून अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाला नाही. त्यानुषंगाने यंत्रणांच्या उदासीनतेत नरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र योजनेत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे नियोजन रखडले आहे. नियोजन कोलमडल्याच्या पृष्ठभूमीवर ह्यनरेगाह्ण अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे उद्दिष्ट केव्हा आणि कसे पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
'या' यंत्रणांकडून रखडले कामांचे नियोजन!
'नरेगा' अंतर्गत जिल्हय़ात प्राधान्याने कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, लघू सिंचन (जलसंधारण) विभाग व जिल्हा परिषद लघू सिंचन विभाग इत्यादी यंत्रणांना कामांचे नियोजन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले; मात्र या यंत्रणांकडून कामांच्या नियोजनाचे अहवाल अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाले नाही. त्यामुळे ह्यनरेगाह्ण अंतर्गत प्राधान्याने करावयाच्या जिल्हय़ातील कामांचे नियोजन रखडले आहे.
असे आहे कामांचे उद्दिष्ट!
नरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत जिल्हय़ात प्राधान्याने करावयाच्या कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये २ हजार ५00 सिंचन विहिरी, १ हजार ४00 शेततळे, २ हजार ३00 शौचालयांची बांधकामे, २ हजार ६00 शोषखड्डे, २ हजार ४00 हेक्टर फळबाग लागवड, ४ हजार ५00 ग्राम सबलीकरण, ३ हजार ३00 व्हर्मी कंपोस्ट टाके, ३ हजार ३00 नाडेप टाके, १८ लाख रोपे निर्मिती, १ लाख ८0 हजार वृक्ष लागवड, ७७0 गावतलाव-पाणीसाठय़ाचे नूतनीकरण, ७७0 गाळ काढण्याची कामे आणि ७६0 जलसंधारणाची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.