एनटीएसईचे विद्यार्थी भविष्यात आयएएस अधिकारी : कटियार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:38+5:302021-06-22T04:13:38+5:30
शिक्षण विभाग जिल्हा परिषद, अकोला, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती ,अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला यांच्याद्वारे राष्ट्रीय प्रज्ञाशोध ...
शिक्षण विभाग जिल्हा परिषद, अकोला, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती ,अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला यांच्याद्वारे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या राज्यस्तर परीक्षेत मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ १८ जून रोजी दुपारी न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला.
इयत्ता १०च्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावंतांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साहाय्य करावे आणि त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी, असे मनोगत अध्यक्षीय भाषणात अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मांडवगणे व्यक्त केले. जिद्द, चिकाटी व दृढ विश्वासाने तुम्ही जग जिंकू शकता, असा सल्ला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी दिला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी दिलीप तायडे यांनी केले. कार्यक्रमाला विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बळीराम झामरे, सचिव दिनेश तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुणवत्ता यादी आलेल्या सार्थक ठाकरे, प्रणव झोपे ,तनिष्क मानधने, अजिंक्य धर्मे, मकरंद रेळे, आदित्य जुनगडे, दक्ष सावके, मिहीर टाले, विनीत गोल्डे, ओजस सोळंके, श्रीराज काळबांडे, हर्षवर्धन खुमकर,साक्षी कराळे, नमस्वी शेगोकार, वृषभ अग्रवाल, परिमल टिंगणे, पराग चिमणकर, विघ्नेश सांगळे, यश गुट्टूवार, मृणाल सावरकर, शुभम गढे, पियांशू शिरसाट, सानिका गावनार, सिद्धांत पस्तापुरे, निधी सरदार, वेदान्त गजभिये, दीप्ती ठाकरे आदींचा सत्कार करण्यात आला. संचालन प्राचार्य माधव मुन्शी यांनी, तर आभार संयोजक डॉ. रवींद्र भास्कर यांनी केले. यावेळी प्राचार्य माधव मुन्शी, शशिकांत बांगर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य मेघा देशपांडे, प्राचार्य प्रज्ञा पिंपळे, उपप्राचार्य विज्ञान रेलकर, पर्यवेक्षक दत्तात्रय तारे, विज्ञान अध्यापक मंडळाचे दीपक गोल्डे, विश्वास जढाळ, सुरेश किरतकर, मुरलीधर थोरात, ओरा चक्रे, विजय पजई, धर्मदीप इंगळे, वंदना बुरघाटे, दीपक वाघमारे यांनी सहकार्य केले.
फोटो: