जिल्ह्याबाहेरील बस फेऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 11:06 AM2021-06-07T11:06:33+5:302021-06-07T11:06:56+5:30
State Transport Bus : सोमवारपासून नागपूर, औरंगाबाद, जळगाव खान्देश जिल्ह्यासाठी फेऱ्या वाढविल्या आहेत.
अकोला : निर्बंधांमध्ये सूट मिळत असल्याने एसटी महामंडळाकडून बस फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याने सोमवारपासून नागपूर, औरंगाबाद, जळगाव खान्देश जिल्ह्यासाठी फेऱ्या वाढविल्या आहेत.
सोमवारपासून अकोला, अकोट आगारातून काही बसेस लांब पल्ल्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. गत काही दिवसांपासून मर्यादा असल्याने अनेक बसेस आगारात धूळ खात होत्या. निर्बंध शिथिल झाल्याने आता सोमवारपासून पूर्ण क्षमतेने बसेस धावणार असून, जिल्ह्याबाहेरील फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. १ जूनपासून बुलडाणा, अमरावती जिल्ह्यासाठी फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज बसस्थानकात गर्दी होत असून, काही प्रमाणात महामंडळाच्या पदरात उत्पन्न पडणार आहे.