तेल्हारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:52+5:302021-05-10T04:18:52+5:30
लॉकडाऊनमध्ये नागरिक ऐकत नसल्याने, खरेदी किंवा इतर कामांसाठी नागरिक सकाळपासूनच बाहेर पडतात. याचा परिणाम म्हणजे सकाळी १० ते ११ ...
लॉकडाऊनमध्ये नागरिक ऐकत नसल्याने, खरेदी किंवा इतर कामांसाठी नागरिक सकाळपासूनच बाहेर पडतात. याचा परिणाम म्हणजे सकाळी १० ते ११ च्या सुमारास एकच गर्दी होत आहे. दुकानदारसुद्धा दुकानांबाहेर उभे राहून ग्राहक आत सोडून दुकानदारी करीत आहेत.
ग्रामीण भागात होत असलेली मंगलकार्य किंवा अंत्ययात्रा याप्रसंगी होत असलेली रेलचेल तसेच बाहेर ठिकाणावरून येणारे नागरिक यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र रविवार रात्री १२ वाजेपासून जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केले. आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे. प्रशासन या निर्णयाची कशाप्रकारे अंमलबजावणी करते, यावरही सर्व अवलंबून आहे.
पेट्रोलपंपाला दहा हजाराचा दंड
लॉकडाऊनच्या काळात पेट्रोलपंप उघडून पेट्रोल विक्री करणे शेगाव रोडवरील एका पेट्रोलपंपचालकाला चांगलेच महागात पडले. महसूल विभागाला याची माहिती मिळाली असता, महसूल विभागाने तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या निर्देशानुसार पेट्रोलपंपचालकाला दहा हजार रुपये दंड ठोठावला.