अकोला जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा ३०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 06:18 PM2020-12-07T18:18:20+5:302020-12-07T18:18:43+5:30

CoronaVirus in Akola बाळापूर तालुक्यातील आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींचा आकडा ३०० वर गेला आहे.

The number of corona victims in Akola district is over 300 | अकोला जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा ३०० वर

अकोला जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा ३०० वर

Next
ठळक मुद्देएकूण रुग्णसंख्या ९६७७ झाली आहे.सद्यस्थितीत ६४८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, सोमवार सात डिसेंबर रोजी बाळापूर तालुक्यातील आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींचा आकडा ३०० वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९६७७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये आदर्श कॉलनी येथील दोघांसह तोष्णीवाल लेआऊट, खदान, संताजी नगर, खेतान नगर, अकोट, गीता नगर, मोठी उमरी, खदान व कौलखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

पारस व मांजरी येथील दोघांचा मृत्यू
बाळापूर तालुक्यातील पारस येथील ५६ वर्षीय पुरुष व मांजरी येथील ६६ वर्षीय पुरुष अशा दोघांचा सोमवारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २१ नोव्हेंबर व ५ डिसेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

१२ जणांना डिस्चाज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, बिºहाडे हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


६४८अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९६७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: The number of corona victims in Akola district is over 300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.