खासगी रुग्णालयातून जीएमसीत संदर्भित गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:05+5:302021-04-27T04:19:05+5:30
रुग्णखाटेसाठी रुग्णवाहिकेतच वेटिंगवर सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन खाटा उपलब्ध नाहीत, मात्र रुग्ण आल्यानंतर त्यांच्यासाठी वेळेवर खाटांची तडजोड केली जात आहे. ...
रुग्णखाटेसाठी रुग्णवाहिकेतच वेटिंगवर
सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन खाटा उपलब्ध नाहीत, मात्र रुग्ण आल्यानंतर त्यांच्यासाठी वेळेवर खाटांची तडजोड केली जात आहे. दरम्यानच्या काळात रुग्ण खाटेसाठी रुग्णवाहिकेतच वेटिंगवर राहत असल्याचे चित्र गत काही दिवसांपासून पाहावयास मिळत आहे.
मृत्यूदर कमी दिसण्यासाठीची धडपड
कोरोना काळातही खासगी रुग्णालयांचे रेटिंग चांगले राहावे, रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण कमी दिसावे यासाठी खासगी रुग्णालयांची धडपड दिसून येत आहे. या अनुषंगाने खासगी रुग्णालयांतून गंभीर रुग्णांवर तीन ते चार दिवस उपचार करून त्यांना सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित केले जात असल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे. काही नातेवाईक आर्थिक अडचणीमुळेदेखील रुग्णांना खासगी रुग्णालयातून सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना घेऊन येत आहेत.
तज्ज्ञ मनुष्यबळाचा प्रश्न कायम
कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत मनुष्यबळ कमी पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. ही स्थिती पाहता गत आठवड्यात पालकमंत्री यांनी कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ वाढविण्याची ग्वाही दिली होती, मात्र अद्यापही सर्वोपचार रुग्णालयाला मनुष्यबळ मिळाले नाही.