रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडणा-यांची संख्या अधिक
By admin | Published: December 16, 2014 12:51 AM2014-12-16T00:51:42+5:302014-12-16T01:19:43+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिका-यांची माहिती.
अकोला : राज्यात गेल्या तीन वर्षांत रेल्वे मार्गावर घडलेल्या अपघातांमध्ये १0,४३८ जणांचा मुत्यू झाला. यापैकी ५,२३१ अपघात हे रूळ ओलांडताना झाले असून, ५५ टक्के घटना या रूळ ओलांडताना घडल्याचे आढळून आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
राज्याची ह्यजीवनवाहिनीह्ण म्हणून ओळखल्या जाणार्या मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना झाल्याची नोंद रेल्वे प्रशासनाच्या लेखी झाली आहे. रेल्वे मार्गावर गेल्या तीन वर्षांत १0 हजार ४३८ अपघाती मृत पावणार्यांपैकी ५ हजार २३१ अपघात केवळ रूळ ओलांडताना झाले आहेत. यात बहुतांश मृत्यू रेल्वे स्थानकावर एका प्लॅटफार्मवरून दुसर्या प्लॅटफॉर्मवर रूळ ओलांडताना आणि रेल्वे कर्मचारी तैनात नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर झाले आहेत.
मानसिकता कारणीभूत
राज्यात अनेक ठिकाणी अघोषित रेल्वे क्रॉसिंग निर्माण झालेले आहेत. बहुतांश स्थानकांवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक पूल आहेत. रेल्वे प्रशासनानेदेखील अनेक ठिकाणी प्रवाशांना धोका न पत्करण्याबाबत सूचना फलक लावले आहेत. असे असतानाही पुलांचा वापर न करता सर्रास रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार नागरिक करीत आहेत. संरक्षक भिंतींनादेखील छेद देत नागरिकांनी छुपेमार्ग निर्माण केले असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना घडणार्या अपघातांचे प्रमाण राज्यातील रेल्वे स्थानकांवर सर्वाधिक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे; तसेच ठिकठिकाणी राज्यात रेल्वे मार्गालगतच्या गावकर्यांनी अघोषित रेल्वे क्रॉसिंग निर्माण केले आहेत. अशा ठिकाणी रूळ ओलांडताना अपघात घडल्याच्या घटनादेखील अधिक असल्याने नागरिकांनी मानसिकता बदल्याची गरज असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिकार्यांनी दिली.