शेतकरी आत्महत्यांचा आलेखही वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:53+5:302021-03-19T04:17:53+5:30

विदर्भातील शेतकरी हा नेहमीच विवंचनेत आयुष्य कंठत आला आहे. कधी कर्जाचा डोंगर तर कधी मुलीच्या हुंड्याची काळजी त्याला सतत ...

As the number of farmer suicides increases | शेतकरी आत्महत्यांचा आलेखही वाढताच

शेतकरी आत्महत्यांचा आलेखही वाढताच

Next

विदर्भातील शेतकरी हा नेहमीच विवंचनेत आयुष्य कंठत आला आहे. कधी कर्जाचा डोंगर तर कधी मुलीच्या हुंड्याची काळजी त्याला सतत सतावत आली आहे. त्यातच नापिक व अवर्षण पाचवीला पुजले आहे अशी स्थिती. निसर्ग साथ देत नाही व सरकार मदत करत नाही यामुळे चिंतेत पडलेल्या हजारो शेतकऱ्यांनी अखेर चिता जवळ केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे धगधगते वास्तव समोर आल्यानंतर सरकारने पॅकेज पासून तर कर्जमाफीपर्यंत पाऊल उचलेपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या आहुत्या गेल्या होत्या. पॅकेजची मलमपट्टी करूनही आत्महत्या काही थांबल्या नाहीत

बाॅक्स

19 मार्च 1986 या दिवशी चिल-गव्हाण (यवतमाळ) चे शेतकरी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. पती-पत्नी आणि चार मुलांचे शव एका खोलीतून काढण्यात आले तेंव्हा सारा महाराष्ट्र हादरला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते आणि सरकारने शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून गंभीरपणे उपाययोजना करण्याचे सुचवले होते.

काेट

माझे वडील हरिदास रतन इंगळे यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली शासनाने आमच्या परिवाराला मदत केली. आता आम्ही आमच्या एक एकराच्या तुकड्यावर आईसह उदरनिर्वाह करीत आहे

अमर इंगळे चोहोगाव

Web Title: As the number of farmer suicides increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.