गर्भवती मातांमधील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण घटले

By admin | Published: March 8, 2017 07:19 PM2017-03-08T19:19:24+5:302017-03-08T19:19:24+5:30

अकोला जिल्ह्यात गत तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, गर्भवती माता एचआयव्हीग्रस्त होण्याचे प्रमाण घटल्याचे शुभवर्तमान समोर आले आहे.

The number of HIV infections in pregnant mothers decreased | गर्भवती मातांमधील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण घटले

गर्भवती मातांमधील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण घटले

Next

जिल्ह्यात यावर्षी ३६ हजारांवर महिलांची तपासणी : १३ महिलांमध्ये आढळला संसर्ग
अकोला : एचआयव्ही एड्स या जीवघेण्या रोगावर कोणताही खात्रीलायक उपचार नसला, तरी या रोगापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंध हाच पर्याय आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांमुळे या जीवघेण्या रोगाचा प्रसार कमी झाला आहे. अकोला जिल्ह्यात गत तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, गर्भवती माता एचआयव्हीग्रस्त होण्याचे प्रमाण घटल्याचे शुभवर्तमान समोर आले आहे.
वैद्यकशास्त्राने कीतीही प्रगती केली असली, तरी एचआयव्ही अजुनही खात्रीलायक उपचार सापडलेला नाही. एचआयव्हीच्या प्रसाराबाबत आजही समाजात बरेच अज्ञान दिसून येते. असुरक्षित शारिरीक संबंध, दुषीत रक्त, दुषीत सुई आणि गर्भवती मातेपासून तीच्या बाळाला या चार कारणांमुळे एचआयव्हीचा प्रसार होऊ शकतो. एचआयव्हीचे संक्रमण होण्यास कारणीभूत असलेल्या कारणांपैकी एचआयव्हीग्रस्त मातेपासून तिच्या बालकास हा रोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मातेकडून तिच्या बालकांना एचआयव्हीचे संक्रमण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने ह्यप्रिव्हेन्शन आॅफ पॅरेंट टू चाईल्डह्ण (पीपीटीसीटी) हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम २००२ पासून हाती घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी गर्भवती महिलांची मोफत तपासणी केल्या जाते. यामध्ये प्रत्येक गर्भवती महिलेचे समुपदेशन करून तिच्या संमतीने चाचणी करण्यात येते. चाचणीमध्ये महिला एचआयव्हीग्रस्त आढळून आल्यास तिच्यावर चौथ्या महिन्यापासून त्वरित ह्यएआरटीह्ण औषधोपचार करण्यात येतो, तसेच जन्मलेल्या बालकालासुद्धा त्याच्या वजनाप्रमाणे औषधोपचार सुरू केल्या जातो. शासनाच्या विविध कार्यक्रमांमुळे जनमानसांत एचआयव्हीच्या प्रसाराबाबत जनजागृती झाली असून, जिल्ह्यात या रोगाचा प्रसार घटल्याचे दिसून येत आहे.

गत तीन वर्षांची आकडेवारी
वर्ष तपासणी एचआयव्हीग्रस्त गर्भवती
२०१४-१५ ४००८१ ३६
२०१५-१६ ४५९२६ २२
२०१६-१७ (फेब्रू.)३६४२५ १३

एचआयव्हीचा प्रसार रोखण्यसाठी आरोग्य विभागाकडून विविध कार्यक्रम राबविले जातात. प्रत्येक गरोदर मातेने आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन एचआयव्ही चाचणी करणे गरजेचे आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: The number of HIV infections in pregnant mothers decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.