कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आलेख वाढताच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:31+5:302021-06-03T04:14:31+5:30

ग्रामीण भागात हैदोस कोविडच्या दुसर्‍या लाटेने मे महिन्यात ग्रामीण भागात हैदोस घालण्यास सुरुवात केली. अकोला महापालिकेच्या हद्दीनंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ...

As the number of patients and deaths in the second wave of Kovid increases! | कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आलेख वाढताच!

कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आलेख वाढताच!

Next

ग्रामीण भागात हैदोस

कोविडच्या दुसर्‍या लाटेने मे महिन्यात ग्रामीण भागात हैदोस घालण्यास सुरुवात केली. अकोला महापालिकेच्या हद्दीनंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने रुग्ण समोर आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावरचे नियंत्रण सुटले. परिणामी, संसर्ग फोफावत गेला व प्रतिदिवस पाचशेहून अधिक रुग्ण जिल्ह्यात आढळले.

दुसऱ्या लाटेचा वाढता आलेख

महिना- रुग्ण - मृत्यू

जानेवारी - १,१३५ - १४

फेब्रुवारी - ४,५२७ - ३१

मार्च - ११,५५५ - ८६

एप्रिल - १२,४६० - २३६

मे - १५,३६१ - ३७६

जून महिन्याची सुरुवात दिलासादायक

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत असली, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरूच आहे. मागील चार महिन्यांच्या तुलनेत मे महिन्यातील मृत्युदर हा सर्वाधिक २.४७ टक्क्यांवर आहे. जून महिन्याची सुरुवात मात्र दिलासादायक झाली असून, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही काही प्रमाणात घटले आहे. असे असले, तरी मृत्यूचे सत्र कायम असून, ही चिंता वाढविणारी बाब आहे.

Web Title: As the number of patients and deaths in the second wave of Kovid increases!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.