शहरातील काेराेना रूग्णांची संख्या वाढतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:18+5:302021-03-22T04:17:18+5:30
पुर्व झोन अंतर्गत आर.टी.पी.सी.आर.चाचणीसाठी 153 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले तसेच रॅपीड अॅन्टीजेन चाचणी साठी एकुण 78 स्वॅब घेण्यात आले ...
पुर्व झोन अंतर्गत आर.टी.पी.सी.आर.चाचणीसाठी 153 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले तसेच रॅपीड अॅन्टीजेन चाचणी साठी एकुण 78 स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून 5 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आहे आणि 73 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहे, पश्चिम झोन अंतर्गत आर.टी.पी.आर. चाचणीसाठी 155 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहे आणि रॅपीड अॅन्टीजेन चाचणी साठी एकुण 150 स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून 2 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आहे आणि 148 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहे, उत्तर झोन अंतर्गत आर.टी.पी.आर. चाचणीसाठी 74 आणि रॅपीड अॅन्टीजेन चाचणी साठी एकुण 607 स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून 45 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आहे आणि 562 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहे, तसेच दक्षिण झोन अंतर्गत आर.टी.पी.आर. चाचणीसाठी 160 आणि रॅपीड अॅन्टीजेन चाचणी साठी एकुण 252 स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून 14 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझेटीव्ह आले आहे आणि 238 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहे. तसेच दि. 20 मार्च रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत 107, पश्चिम झोन अंतर्गत 70, उत्तर झोन अंतर्गत 72 आणि दक्षिण झोन अंतर्गत 94 असे एकुण 343 नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझेटीव्ह आलेले आहे.
बाॅक्स
लक्षणे असले तरी चाचणी करा
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व कोरोना सदृष्य लक्षणे असतील त्यांनी आपली झोन अंतर्गत सुरू असलेल्या कोव्हीड-19 चाचणी केंद्रावर जाउन किंवा मनपाव्दारे सुरू करण्यात आलेल्या मोबाईल कोव्हीड चाचणी बस मध्ये कोरोना चाचणी करावी असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे