सर्दी, ताप, खोकल्यासोबतच अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:33 PM2019-01-19T13:33:36+5:302019-01-19T13:33:44+5:30
अकोला : बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप सोबतच अस्थमा व दम्याच्या आजारामुळे अकोलेकर त्रस्त आहेत. परिणामी दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले असून, नागरिकांनी योग्य उपाय योजना करून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
अकोला : बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप सोबतच अस्थमा व दम्याच्या आजारामुळे अकोलेकर त्रस्त आहेत. परिणामी दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले असून, नागरिकांनी योग्य उपाय योजना करून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
थंडीसोबतच शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा थेट परिणाम अकोलेकरांच्या आरोग्यावर होत असून, फुफ्फुस व स्वसनाशी निगडित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शिवाय, बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला अन् तापीच्या आजाराची साथदेखील सुरू आहे. एकाच वेळी विविध आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजार लवकर बरा होत नसल्याने स्वाइन फ्लू, चिकुनगुनियासदृश लक्षण आढळून येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले आहेत. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास घाबरण्यासारखे कारण नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे; परंतु आजारच होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
पॅरालिसीस व ह्रदयविकाराचेही प्रमाण वाढले!
थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला व ह्रदयाला आवश्यक रक्त पुरवठा होत नाही. परिमाणी, या दिवसात पॅरालिसीस व ह्रदयविकाराचे प्रमाणही वाढते.
बचावासाठी हे करा!
रात्रीच्या जेवणानंतर थंड हवेत फिरणे टाळावे.
रात्रीचा प्रवास टाळावा.
थंड पाण्याचे सेवन टाळा.
अती धावपळ टाळावी.
या दिवसात सर्दी, ताप, खोकल्यासह अस्थमाचे रुग्ण अधिक आढळतात. शिवाय, पॅरालिसीस व ह्रदयविकाराचेही प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत योग्य काळजी व नियमित व्यायाम हेच आजारापासून आपला बचाव करू शकतात.
-डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.