‘जलयुक्त शिवार’च्या नियोजनात गावांची संख्या वाढणार!
By admin | Published: February 25, 2016 01:40 AM2016-02-25T01:40:00+5:302016-02-25T01:40:00+5:30
निवड करण्यात आलेल्या १२५ गावांमध्ये झाली शिवारफेरी.
अकोला: जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांसाठी शिवारफेरी पूर्ण करण्यात आली. तथापि मागणी लक्षात घेऊन, निकषात बसणार्या गावांचाही समावेश करण्यात येणार असल्याने, ह्यजलयुक्त शिवारह्ण गाव निवडीच्या नियोजनात गावांची वाढ होणार आहे.
वारंवार उद्भवणार्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून, गतवर्षीपासून शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत गतवर्षी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यात २00 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात नवीन १२५ गावांची निवड गत जानेवारीमध्ये करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या जलयुक्त शिवारच्या कामांसाठी शिवारफेरी काढण्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले. तथापि जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या गावांची संख्या कमी असल्याच्या पृष्ठभूमीवर, मागणी आणि निकषात बसणार्या गावांचा समावेश निवड करण्यात आलेल्या गावांच्या यादीत करण्यात येणार आहे,असे संकेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिले आहेत, तसेच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील गावांच्या निवडीमध्ये आणखी गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडे मांडला. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांसाठी गावे निवडीच्या नियोजनात गावांची वाढ होणार आहे.