पूर्व झाेनमधील नागरिकांचा लसीकरणाला नन्ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:46+5:302021-06-16T04:25:46+5:30

शहरात फेब्रुवारी महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली. यामध्ये पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाबाधित रुग्णांची प्रचंड संख्या वाढल्याचे चित्र हाेते. ...

Nunna to vaccinate citizens in East Zen! | पूर्व झाेनमधील नागरिकांचा लसीकरणाला नन्ना!

पूर्व झाेनमधील नागरिकांचा लसीकरणाला नन्ना!

Next

शहरात फेब्रुवारी महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली. यामध्ये पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाबाधित रुग्णांची प्रचंड संख्या वाढल्याचे चित्र हाेते. ही संख्या कमी हाेत नसल्याचे पाहून अखेर महापालिका प्रशासनाला दाेन्ही झाेन हाॅटस्पाॅट घाेषित करून नागरिकांच्या आराेग्य सर्व्हेला सुरुवात करावी लागली हाेती. साहजिकच या दाेन्ही झाेनमध्ये काेराेनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेणे अपेक्षित हाेते. त्याच्या नेमके उलटे चित्र समाेर आले आहे. शहरातील इतर झाेनमधील लसीकरण केंद्रांमधील आकडेवारी पाहता पूर्व झाेनमधील लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

शहरात सर्वात कमी लसीकरण झालेली केंद्रे ! अ उमरी नागरी आराेग्य केंद्र : ८९

ब नायगाव नागरी आराेग्य केंद्र : ८१०

क देशमुख मल्टिसीटी हाॅस्पिटल : ८८७

ड मलकापूर अंगणवाडी : १५६८

शहरात सर्वात जास्त लसीकरण झालेली केंद्रे !

अ कस्तुरबा गांधी रुग्णालय : ११,४४७

ब राधादेवी ताेष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय : ८४६२

क जिल्हा सामान्य रुग्णालय : ७२७७

ड शुक्ल चिल्ड्रेन हाॅस्पिटल : ६४९७

लसीकरण कमी होण्याचे कारण

ज्येष्ठांसाठी आधी कूपन पद्धत सुरू करण्यात आली. नंतर ऑनलाइन अपाॅइंटमेंटसाठी सकाळी ६ वाजताची वेळ ठरविण्यात आली. यात पुन्हा बदल करून काही ठिकाणी कूपन तर काही ठिकाणी ऑनलाइन नाेंदणी सुरू केली. यामुळे नागरिक बुचकळ्यात पडले असून, ज्येष्ठांनी या संपूर्ण प्रक्रियेकडेच पाठ फिरवली आहे.

केवळ २७ टक्के लसीकरण

मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतर २०११च्या जनगणनेनुसार शहराची लाेकसंख्या पाच लाख ३६ हजार आहे. आजपर्यंत ९६ हजार ३७७ नागरिकांनी लसीचा पहिला डाेस घेतला असून, ३८ हजार २६१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

लसीकरणाची गती वाढावी या उद्देशातून आम्ही लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कूपन आणि १८ वयाेगटातील तरुणांसाठी ऑनलाइन नाेंदणी केल्यामुळे गाेंधळ कमी झाला आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- निमा अराेरा आयुक्त, मनपा

Web Title: Nunna to vaccinate citizens in East Zen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.