नर्सरी, केजीचे २६ हजार चिमुकले यंदाही राहणार घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:44+5:302021-05-27T04:20:44+5:30

शहरातील नर्सरी टु केजीच्या शाळा २०१९-२०- २०१(शाळा)- २७७०४ २०२०-२०२१- २०४(शाळा)- २८९४२ गत ...

Nursery, 26,000 chimpanzees will remain at home this year too! | नर्सरी, केजीचे २६ हजार चिमुकले यंदाही राहणार घरातच!

नर्सरी, केजीचे २६ हजार चिमुकले यंदाही राहणार घरातच!

Next

शहरातील नर्सरी टु केजीच्या शाळा

२०१९-२०- २०१(शाळा)- २७७०४

२०२०-२०२१- २०४(शाळा)- २८९४२

गत वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलेच शाळेत येत नसल्याने, अनेक पालकांनी शैक्षणिक शुल्कसुद्धा भरलेले नाही. त्यामुळे शाळेचा खर्च भागविणे कठीण जात आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

- प्रा. नितीन बाठे, संस्थाचालक

मागील वर्षीपासून नर्सरी, केजीची शाळा बंद आहे. गत वर्षभरापासून शाळेत मुलांचा किलबिलाटच हरविला आहे. ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. मात्र शाळाच बंद असल्यामुळे पालकांनी शुल्कही दिलेले नाही. त्यामुळे शाळेतील मेंटेनन्स, शिक्षकांचा पगार कसा द्यावा, असा प्रश्न आहे. शासनाने यातून काहीतरी पर्याय काढावा.

- प्रदीप राजपूत, संस्थाचालक

कोरोनामुळे मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा बंदच आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा चालविताना कसरत करावी लागत आहे. पालक शैक्षणिक शुल्क भरण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा सुरू होण्याची शक्यता दिसत नाही.

- प्रा. प्रकाश डवले, संस्थाचालक

पालक त्रस्त....

शाळा बंद असल्यामुळे मुले ऑनलाइन शिक्षण घेत असली तरी मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. मुले घरात राहून कंटाळली आहेत. त्यांच्या शैक्षणिक सत्राविषयी चिंता वाटते. कोरोनामुळे शाळा होतील की नाही याबाबत सध्यातरी साशंकता आहे.

- गाेपाल गावंडे, पालक

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु मुलांना आता ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. शाळा कधी सुरू होतात याची पालकांसोबतच विद्यार्थीही वाट पाहात आहेत. मोबाइल स्क्रीनवर विद्यार्थ्यांचा अधिक वेळ जात असल्याने, त्यांच्या डोळ्यांवर, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- अनुराधा खंडारे, पालक

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यात आता लहान मुलांनासुद्धा धोका असल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू होणे कठीण वाटते. परंतु मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचीही चिंता वाटते. ऑनलाइन शिक्षणाचा सातत्याने मारा होत असल्याने, विद्यार्थीही आता कंटाळले आहेत.

- प्रवीण शिंदे, पालक

Web Title: Nursery, 26,000 chimpanzees will remain at home this year too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.