अंगणवाड्यांमध्ये नर्सरी वर्ग सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:56 PM2019-06-11T13:56:18+5:302019-06-11T13:57:29+5:30

अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) वर्ग सुरू करण्याची तयारी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

Nursery classes to be started in Anganwadis! | अंगणवाड्यांमध्ये नर्सरी वर्ग सुरू होणार!

अंगणवाड्यांमध्ये नर्सरी वर्ग सुरू होणार!

googlenewsNext

अकोला : महिला व बालकल्याण विभागाकडून सुरू असलेल्या अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) वर्ग सुरू करण्याची तयारी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाला आढावा सभेत दिले. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमही राबविले जाणार आहेत.
सभेत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विकास आराखडा तयार करणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रशिक्षणाचे केंद्रनिहाय नियोजन करून त्यासाठी मास्टर ट्रेनर तयार करणे, इयत्ता पहिली व दुसरी अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग प्लॅन तयार करणे, जॉयफुल लर्निंगसाठी टेस्ट तयार करणे, इयत्ता १ ते ८ च्या प्रश्नपत्रिका पिसावर आधारित असणे, केलेले साप्ताहिक नियोजन याबद्दल साहेबांनी स्तुती केली आहे. पुढील सभेत नियोजन सादर करायचे आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी भेटीचे नियोजन करावे, शाळांच्या टिष्ट्वनिंगसाठी ५० चांगल्या खासगी शाळांची निवड करणे, शिक्षकांनी ओळखपत्र लावून शाळेत उपस्थित राहावे, शालेय पोषण आहार, ‘आरटीई’ प्रवेशाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

 

Web Title: Nursery classes to be started in Anganwadis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.