आठवडी बाजार परिसरात वृक्षारोपण करून संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:20 AM2021-09-11T04:20:55+5:302021-09-11T04:20:55+5:30

तेल्हारा : येथील आठवडी बाजार परिसरात, तसेच उद्यानात श्री शिवाजी मंडळाने वृक्षारोपण करून संगोपन केले आहे. शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी ...

Nurture by planting trees in the weekly market area | आठवडी बाजार परिसरात वृक्षारोपण करून संगोपन

आठवडी बाजार परिसरात वृक्षारोपण करून संगोपन

Next

तेल्हारा : येथील आठवडी बाजार परिसरात, तसेच उद्यानात श्री शिवाजी मंडळाने वृक्षारोपण करून संगोपन केले आहे. शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केला जातो. मात्र, श्री शिवाजी मंडळाने पुढाकार घेऊन वृक्षसंवर्धन केले आहे. शहरातील आठवडी बाजार परिसर व महात्मा फुले चौकातील उद्यानामध्ये लोकवर्गणीतून वृक्षारोपण केले आहे. यासाठी सुरेश पवार, विठ्ठल सिंह, कुंडलवाल, डॉ श्रीराम टोहरे, वसंतराव घंगाळ, शालीकराम सोनटक्के, अरुण नायसे, अनिल पवार, तुकाराम मारखडे, मंगेश घोंगे, सचिन कुडंलवाल, गजानन पवार, गजानन मानकर, अंकुश बोराडे, सुखदेव धनभर, सुधाकर तायडे, डॉ. महेश साखरकार, लायनू अवचार, शेख मोनू, संतोष ससाने यांनी परिश्रम घेतले आहे.

-------

आठवड्यातून दोन दिवस केली जाते स्वच्छता

आठवडी बाजार व उद्यान परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. मात्र, श्री शिवाजी मंडळाद्वारे आठवड्यातून दोन दिवस उद्यान परिसरात स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आठवड्यातून दोन दिवस साफसफाई करण्यात येत आहे.

Web Title: Nurture by planting trees in the weekly market area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.