पोषण आहार खर्चात साडेसात टक्क्यांची वाढ

By admin | Published: November 14, 2014 10:54 PM2014-11-14T22:54:10+5:302014-11-14T23:07:27+5:30

खिचडी शिजविणा-या बचत गटांना दिलासा.

Nutrition expenditure is up by seven and a half percent | पोषण आहार खर्चात साडेसात टक्क्यांची वाढ

पोषण आहार खर्चात साडेसात टक्क्यांची वाढ

Next

वाशिम - विद्यार्थ्यांच्या पोषण आहार खर्चात आता साडेसात टक्यांची वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा खिचडी शिजविणार्‍या बचत गटांना मिळणार आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजनाची योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीमध्ये खिचडीचे वाटप करण्यात येते. ही खिचडी शिजविण्याचे कंत्राट बचतगट अथवा एखाद्या संस्थेला दिले जाते. दिवसागणिक वाढणारी महागाई व खिचडी शिजविण्यासाठी येणारा खर्च, यातील तफावत वाढल्यामुळे खर्चात वाढ करावी, अशी मागणी सुरू होती. या मागणीची दखल घेऊन सरकारने या खर्चात साडेसात टक्यांनी वाढ केली आहे. पहिली ते पाचवी पयर्ंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागील प्रत्येक दिवसाच्या खर्चाची र्मयादा सरकारने ३.३४ रूपयांहून ३.५0 रूपये, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच रु पयांवरून ५.२0 रूपये एवढी वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार्‍या ३.५0 रुपयांमध्ये २.१९ रू पये धान्य अथवा इतर पुरक बाबींसाठी तर १.३१ पैसे इंधन व भाजीपाल्यासाठी दिले जाणार आहेत. सहावी ते आठवीसाठी दिल्या जाणार्‍या ५.२0 रूपयांमध्ये ३.३६ रूपये धान्य अथवा इतर पुरक बाबींसाठी, तर १.६४ रूपये इंधन आणि भाजीपाल्यासाठी देण्यात येणार आहेत.

Web Title: Nutrition expenditure is up by seven and a half percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.