पोषण आहार आदेशाने शिक्षक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:45 PM2017-10-14T23:45:28+5:302017-10-14T23:45:47+5:30

शालेय पोषण आहाराचे धान्य आता शाळांनीच खरेदी करावेत असा फतवाच शासनाने काढल्याने प्राथमिक शाळांचे शिक्षक नव्या विवंचनेत सपडले आहेत.

Nutrition Food | पोषण आहार आदेशाने शिक्षक विवंचनेत

पोषण आहार आदेशाने शिक्षक विवंचनेत

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : प्राथमिक शिक्षक संघ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : शालेय पोषण आहाराचे धान्य आता शाळांनीच खरेदी करावेत असा फतवाच शासनाने काढल्याने प्राथमिक शाळांचे शिक्षक नव्या विवंचनेत सपडले आहेत. आम्ही ही खरेदी करणार नाही, असा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे. येथील प्राथमिक शिक्षक संघाने यासंदर्भात प्रशासनास अवगत केले आहे.
शासन स्तरावरून पुरवठा करण्याची आधीची पद्धत बंद करून २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून शाळा स्तरावर धान्याची मालाची खरेदी करावी असे हे आदेश आहेत. जवळपास सर्वच शाळांना हे आदेश प्राप्त झाले असून शिक्षक वर्तुळात याआदेशाने चांगलीच खळबळ निर्माण झाली. शासनाने आदेश निर्गमित केले असले तरी अनुदान मात्र मंजूर केले नाही. मग शाळेच्या एवढ्या विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य खरेदी करायचे कसे, असा प्रश्न या शिक्षकांसमारे निर्माण झाला आहे. एखाद्या पुरवठा दाराने एकवेळ उधारी देण्याचे कबूल केले, तर त्याचा निधी केव्हा प्राप्त होईल. याचा भरवसा नाही. शिवाय यात शैक्षणिक कालवधीही खर्ची पडणार आहे. म्हणूनच पुर्वीप्रमाणेस ही योजना सुरू ठेवावी अशी मागणी करणारे निवेदन येथील तहसीलदार व सं.वि.अ. यांना येथील प्राथमिक शिक्षक संघाने दिले.
यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष आंबोरकर, ऊमदेव मोरांडे, राज एकवनकर, गजेंद्र जवजाळ, गजानन रत्नपारखी, राजेंद्र चंदनबावणे, गिरीधर नगरे संघटनेचे पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.

Web Title: Nutrition Food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.