पोषण आहाराच्या खर्च र्मयादा ७.५ टक्क्यांनी वाढली!
By Admin | Published: November 6, 2014 11:05 PM2014-11-06T23:05:12+5:302014-11-06T23:29:07+5:30
शालेय पोषण आहाराच्या सुधारित दराला मान्यता.
बुलडाणा : प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या शालेय पोषण आहार योजनेच्या खर्च र्मयादेत केंद्र शासनाने ७.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. शालेय पोषण आहार योजनेतील प्रति लाभार्थी आहार खर्च र्मयादा आतापर्यंत तीन ते पाच रुपये एवढी होती; मात्र केंद्र सरकारने २0१४-१५ या आर्थिक वर्षापासून खर्च र्मयादेत ७.५ टक्यांनी वाढ केली असून, प्रति लाभार्थी खर्च र्मयादा साडेतीन ते साडेपाच रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.
राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५0 उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७00 उष्मांक आणि २0 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रति विद्यार्थी १00 ग्रॅम, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रति विद्यार्थी १५0 ग्रॅम तांदळाचा पुरवठा केला जातो.
या तांदळापासून शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी अन्न शिजवण्याचे दर ६ डिसेंबर २0१३ रोजी निश्चित करून प्रति लाभार्थी खर्च र्मयादा ठरविण्यात आली होती. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३ रुपये ३४ पैसे, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५ रुपयांपयर्ंत प्रति लाभार्थी खर्च र्मयादा ठरविण्यात आली होती. आता केंद्र सरकारने २0१४-१५ या आर्थिक वर्षापासून या खर्च र्मयादेत ७.५ टक्क्यांनी वाढ केली आहे.
पोषण आहार योजनेसाठी केंद्र सरकार ७५ टक्के, तर राज्य सरकार २५ टक्के भार उचलणार आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही सुधारित दरास २८ ऑक्टोबर रोजी मान्यता दिलीे. सुधारित दरानुसार, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३.५९ रुपये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५.३८ रुपये खर्च र्मयादा निश्चित करण्यात आली आहे.