बालगृह, बालिकाश्रमातील बालकांना आहारविषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:22 AM2021-09-06T04:22:57+5:302021-09-06T04:22:57+5:30
- आहारतज्ज्ञ राधा जोशी यांचे प्रतिपादन अकोला : जीवनात आहार आणि स्वच्छतेला अत्यंत महत्व असल्याने लहानपणापासूनच या ...
- आहारतज्ज्ञ राधा जोशी यांचे प्रतिपादन
अकोला : जीवनात आहार आणि स्वच्छतेला अत्यंत महत्व असल्याने लहानपणापासूनच या दोन बाबींवर लक्ष केंद्रीत केल्यास जीवन आरोग्यदायी बनू शकते, असे मोलाचे मार्गदर्शन आहारतज्ज्ञ राधा जोशी यांनी केले आहे.
तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्यावतीने सध्या पोषण सप्ताह साजरा करण्यात येत असून, गेले सलग तीन दिवस शहरातील बालगृह, बालिकाश्रम याठिकाणी वदनी कवळ घेता या शीर्षकाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पहिल्या दिवशी तुकाराम हॉस्पिटल परिसरातील शासकीय बालगृहात तेथील लहान मुलांना पोषक आहार आणि स्वच्छता याचे महत्व राधा जोशी यांनी समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी मलकापूर येथील गायत्री बालिकाश्रम येथील मुलींनाही त्यांनी पोषक आहाराचे महत्व, मासिक पाळी, मासिक पाळीतील वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीत घेण्याचा आणि टाळण्याचा आहार यासंदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी सुर्योदय बालगृह येथेही राधा जोशी यांनी सिटी चाईल्ड लाईनच्या समन्वयिका हर्षाली गजभिये, विक्रांत बन्सोड, श्वेता शिरसाट आणि रेल्वे चाईल्ड लाईनचे समन्वयक पद्माकर सदांशिव यांच्यासह उपस्थित राहून एड्स या आजाराशी लढा देत असलेल्या मुला-मुलींसोबत संवाद साधला. सुर्योदय बालगृहाचे समन्वयक शिवराज पाटील यांनीही मार्गदर्शन केले.