झाडांना राख्या बांधून घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:15+5:302021-08-23T04:22:15+5:30
पातूर : रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते, तसेच आयुष्यभर आपले ...
पातूर : रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते, तसेच आयुष्यभर आपले रक्षण करावे, असे वचन बहीण भावाकडून घेते. अशा रक्षाबंधनाच्या पर्वावर पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण करण्याची शपथ घेऊन रक्षाबंधन सण साजरा केला.
पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रति प्रेम निर्माण व्हावे, तसेच त्यांना निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीने अनोखे रक्षाबंधन कार्यक्रम राबविण्यात आला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला. शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः अंगणात एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली. रक्षाबंधनाच्या पर्वावर या झाडांची रक्षा करून त्यांचे संवर्धन करण्याची शपथ या वेळी शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली. या उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
----------------
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी यांनी केले मार्गदर्शन
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, वंदना पोहरे, नरेंद्र बोरकर, सुलभा परमाळे, नीतू ढोणे, किरण दांडगे, शीतल कवडकर, अश्विनी अंभोरे, जयेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, रूपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी मार्गदर्शन केले.
220821\img-20210822-wa0368.jpg
अनोखा