आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:56+5:302021-06-19T04:13:56+5:30
अकाेला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेले आरक्षण, तसेच ओबीसींच्या जनगणनेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले ...
अकाेला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेले आरक्षण, तसेच ओबीसींच्या जनगणनेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, तसेच ओबीसी संघटनांकडून शुक्रवारी सकाळी रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. नागपूर मुंबई महामार्गावरील नेहरू पार्क चाैकात झालेल्या या आंदाेलनात माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
सर्वाेच्च न्यायालयाने मार्च, २०२१मध्ये एका याचिकेवर निर्णय देताना, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द केले होते. हे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे, तसेच ओबीसींची जनगणना व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि विविध ओबीसी संघटनांच्या वतीने नेहरू निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकाराच्या विराेधात नारेबाजी करण्यात आली. आंदाेलनात महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा अध्यक्ष प्रा.सदाशिव शेळके, प्रा.विजय उजवणे, अनिल मालगे, महिला जिल्हाध्यक्ष माया ईरतकर, शारदा थोटे, स्नेहा राऊत, पूनम लांडे, सुषमा कावरे, गजानन इंगळे, श्रीकृष्ण बोळे, अनिल शिंदे, स्नेहलता नंदर्धने, जयश्री नवलकर, उमेश मसने, संजय निलखन, पुरुषोत्तम कोठाळे, संजय तायडे, दीपमाला खाडे, सविता तुरके, कल्पना गवारगुरू, रामदास खंडारे, दिनकर नागे, गणेश गाडगे, प्रकाश पाटील, किशोर श्रीनाथ, गणेश पळसोदकर, मो.शब्बीर मो.हमीद, अंकुश वानखडे, सांगर सौदळे, गजानन बारतासे, परशराम बंड सुभाष वाईन्देशकर, लक्ष्मण निखाडे, तुषार उजवणे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
काेट...
ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरूच आहे. मात्र, केंद्र सरकारच्या धाेरणाविराेधात सामान्य कार्यकर्त्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अधिकारात येताे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणखी तीव्र आंदाेलन करण्यात येईल.
- तुकाराम बिडकर, माजी आमदार