सस्ती सरपंच पदाच्या निवडणुकीवर आक्षेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:11+5:302021-03-06T04:18:11+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युवाशक्ती ग्रामविकास पॅनल व प्रणित ग्रामविकास पॅनल रिंगणात होते. युवाशक्ती ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार मीनाक्षी गजानन डाबेराव ...

Objection to cheap sarpanch election! | सस्ती सरपंच पदाच्या निवडणुकीवर आक्षेप!

सस्ती सरपंच पदाच्या निवडणुकीवर आक्षेप!

Next

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युवाशक्ती ग्रामविकास पॅनल व प्रणित ग्रामविकास पॅनल रिंगणात होते. युवाशक्ती ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार मीनाक्षी गजानन डाबेराव अनुसूचित जमाती प्रवर्गात येत असून सुद्धा राजकीय प्राबल्याने सस्ती ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बोगस जातीचे प्रमाणपत्र जोडून त्या आधारावर सरपंचपदाची निवडणूक लढविली असल्याची तक्रार मीनाक्षी डाबेराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे.

प्रणित ग्रामविकास पॅनलच्या द्वारकाबाई आनंदा मेसरे या सरपंचपदी निवडून आल्या. त्यांचे कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र हे १९९६ चे तहसीलदारांच्या सहीचे होते. व २०१६ च्या राज्य शासनाच्या जीआर नुसार उपविभागीय दंडाधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य असताना व कोळी महादेव ही जात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ६ जुलै २०१७ सिव्हिल अपील न.८८२८/२०१५ प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये येत नाही. तसा लेखी आक्षेप ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुकीत घेतल्यावरसुद्धा अध्यासी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अशी याचिका जिल्हाधिकारी यांच्याकडे मीनाक्षी गजानन डाबेराव यांनी केली आहे.

Web Title: Objection to cheap sarpanch election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.