उद्दिष्टांची पूर्तता नाही; करवसुली लिपिकांच्या वेतनवाढीवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:31+5:302021-07-18T04:14:31+5:30
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी करवसुली निरीक्षकांना टॅब देण्यात आले असून, त्यांना महिन्याकाठी किमान २०० पावत्या ...
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी करवसुली निरीक्षकांना टॅब देण्यात आले असून, त्यांना महिन्याकाठी किमान २०० पावत्या फाडणे अर्थात २०० मालमत्ताधारकांजवळून कर वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. पश्चिम, उत्तर व दक्षिण झाेनमध्ये कार्यरत आठ वसुली निरीक्षकांनी अवघ्या ६३, ६५, ८७,८८ अशा पावत्या फाडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास येताच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
जुलै महिन्यांत २१ काेटींचे उद्दिष्ट
करवसुली मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्राेत असून, अकाेलेकरांकडे १०० काेटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. या रकमेची वसुली न झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या निर्माण हाेण्याची शक्यता पाहता मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी जुलै महिन्यांत २१ काेटींचा थकीत कर वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती आहे.