गणपती विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:21 AM2021-09-21T04:21:36+5:302021-09-21T04:21:36+5:30

अकोट : अकोट शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणेश मूर्ती विसर्जन दि.२० सप्टेंबरला सांयकाळपर्यंत शांततेत ...

Obstacles of pits in Ganpati immersion path! | गणपती विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न!

गणपती विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न!

Next

अकोट : अकोट शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणेश मूर्ती विसर्जन दि.२० सप्टेंबरला सांयकाळपर्यंत शांततेत पार पडले. दरम्यान, शहरातील व पोपटखेड मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न असतानाही भाविकांनी संयम व धार्मिक संस्कृती जोपासना करीत पोपटखेड धरणावर पूजन करून विसर्जन केले. याप्रसंगी धरणावरील विसर्जन व्यवस्था व शहरातील गणराया मूर्ती संकलनामुळे भाविकांना दिलासा मिळाला.

अकोट ग्रामीण भागातील व शहरातील मंडळाने पोलीस, महसूल व नगरपरिषदेला सहकार्य करीत कोरोनाचे नियमांचे पालन करून शांततेत विसर्जन पार पाडले. सार्वजनिक मंडळे सकाळी ११ वाजल्यापासूनच गणेश मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले होते. एकाच दिवशी शहर व ग्रामीण भागातील गणेश मूर्ती विसर्जन पार पडले.

पोपटखेड धरणावर ग्रामीण पोलीस ठाण्याने धरणाच्या काठावर सुरक्षित ठिकाणी मुरूम टाकून जागा व्यवस्थित केली. तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी बॅरिकेटेडसुद्धा लावण्यात आले होते. भाविकाचे मूर्ती घेऊन एकलव्य बचाव पथक प्रमुख पांडुरंग तायडे यांच्या पथकातील कार्यकर्त्याच्या सहकार्याने स्वयंस्फूर्तीने पाण्यामध्ये उतरून मूर्तीचे विसर्जन केले. अकोट पोलीस प्रशासन आणि महसूल विभागातर्फे पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाला नवीन लाइफ सेविंग, जॅकेट, रिंग, दोरखंड व्यवस्था करून त्यांच्या सुरक्षिततेबाबत, तसेच त्यांच्या जीवितेला धोका होऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात आली. एका ठिकाणी निर्माल्य जमा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावून नदी-तलावाला प्रदूषणापासून रोखण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व्यवस्थित संकलित करून जमा केले.

यावेळी जिपोअ जी श्रीधर, एस. डी. ओ. श्रीकांत देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शन खाली उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजीव राऊत, तहसीलदार नीलेश मडके, शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून होते. अकोट येथे नव्यानेच उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर बदलीचा आदेश झालेल्या आयपीएस रितू खोकर ह्या गणपती विसर्जनाचे दिवशी आकोटात दाखल झाल्या.

-----------------------

नगर परिषदेच्यावतीने पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

नगर परिषदने पाच ठिकाणी शहरात घरगुती गणेश मूर्ती संकलन केंद्र उघडली होती. या संकलन केंद्रावर भाविकांनी गणपती संकलित केले. शहरात पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, तर पोपटखेड धरणावर ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सार्वजनिक मंडळ व काही गणेश भक्तांनी पोपटखेड धरणावर विसर्जन केले.

Web Title: Obstacles of pits in Ganpati immersion path!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.